मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फुडी IPS अधिकारी कसा झाला फॅट टू फिट? शेअर केली आपली Weight loss Journey

फुडी IPS अधिकारी कसा झाला फॅट टू फिट? शेअर केली आपली Weight loss Journey

सेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत या आयपीएस अधिकाऱ्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या पण...

सेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत या आयपीएस अधिकाऱ्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या पण...

सेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत या आयपीएस अधिकाऱ्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या पण...

नवी दिल्ली, 02 जून : आयपीएस विवेक राजसिंग कुकरेले (IPS Vivek Rajsingh Kukrele) यांनी इयत्ता आठवीनंतर स्वतःचं वजन तपासलं नव्हतं. त्या वेळी त्यांचं वजन 88 किलो होतं. त्यानंतर बराच काळ गेला. कुकरेले यांनी पुन्हा आपलं वजन तपासलं ते राष्ट्रीय पोलीस अकादमीत (NPA) दाखल झाल्यावर. त्यावेळी त्यांचं वजन तब्बल 134 किलो होतं. हे पाहून ते थोडेसे चिंताग्रस्त झाले. पण या अकादमीतल्या प्रशिक्षणामुळे त्यांना त्यांचं वजन घटवण्यास (Weight Loss) मदत झाली. कुकरेले यांनी आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये आपला वजन कमी करण्याचा अनुभव मांडला आहे. अकादमीतल्या प्रशिक्षणामुळं मला माझं अति प्रमाणात वाढलेलं वजन (Weight Gain) कमी करण्यास मदत झाली. एनपीएमधल्या 46 आठवड्यांच्या कठीण प्रशिक्षणामुळे माझं वजन 104 किलोग्रॅमवर आलं. ही माझ्यासाठी मोठी कामगिरी होती, असं ते सांगतात.
सेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत कुकरेले यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी आल्या. ते म्हणाले, 'माझ्या सेवेच्या सुरुवातीच्या कालावधीत माझं पोस्टिंग बिहारमधल्या नक्षलवादी भागात झालं. यादरम्यान माझं वजन पुन्हा वाढून 138 किलोग्रॅमपर्यंत पोहोचलं. खाण्याच्या वर्षानुवर्षांच्या चुकीच्या सवयी हे माझं वजन वाढण्यामागचं प्रमुख कारण होतं. मुळात मी खूप फुडी (Foodie) आहे. त्यामुळे मी प्रमाणापेक्षा जास्त खात असे. अन्नपदार्थ वाया घालवायचे नाहीत हे माझं प्रमुख ध्येय असे. त्यामुळे मनात इच्छा नसताना आणि पोट भरलेलं असतानाही खाणं या चुकीच्या सवयीमुळे माझं वजन वाढत गेलं.' हे वाचा - नाही लागणार औषधाची गरज; या 5 गोष्टी घरच्या घरी Stress करतील दूर कुकरेले यांनी एक असाइनमेंट म्हणून चालण्याचा व्यायाम सुरू केला. स्टेप सेट गो (Step Set Go) या अॅपच्या वापरामुळे या व्यायामात सुसंगतता ठेवता आली. चालणं हा माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनला आणि माझं वजन कमी होऊ लागलं. त्यामुळे पौष्टिक आहाराची विचारपूर्वक निवड करण्यासाठी मला अधिक प्रोत्साहन मिळू लागलं, असं कुकरेले यांनी सांगितलं. हळूहळू वजन कमी होऊ लागल्यानं क्षमतावाढीचं प्रशिक्षण आणि योग्य आहार घेण्यास सुरुवात केली. यामुळे वजन आणखी कमी होण्यास चालना मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून मी ठरवलेल्या प्रमाणातच आहार घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे माझं शरीर आकारबद्ध होण्यास मदत मिळत आहे. मी आत्तापर्यंत 43 किलोग्रॅम वजन कमी केलं असून, मला आता फक्त शरीराच्या आकारावर (Body Shape) लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं कुकरेले यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. हे वाचा - शंभरी पार आजीआजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला त्यांनी आपला आधीचा आणि नंतरचा असे फरक दर्शवणारे दोन फोटोजही शेअर केले आहेत. वजन कमी करण्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे कुकरेले हे आता तंदुरुस्त असून, त्यांचं आरोग्यदेखील सुधारलं आहे. त्यांनी आपल्या रक्तदाब विकारावरही नियंत्रण मिळवले असून, त्यांचा रेस्टिंग पल्स रेट (Resting Pulse Rate) 40 BPM झाला आहे.
First published:

Tags: Fitness, Inspiration, Inspiring story, Police, Weight loss

पुढील बातम्या