नवी दिल्ली, 12 जानेवारी: कोरोना महामारीने (Coronavirus Pandemic) सगळ्यांनाच आर्थिक संकटाच्या दरीत ढकलून दिलं होत. हळूहळू कुठे परिस्थिती रुळावर येतच आहे कि नाही तोपर्यंत मुलभूत वस्तू महागण्यास सुरुवात झाली आहे. दैनंदिन वापरातील साबण, तेल, दंतमंजन, खाद्यतेल, पॅकेट बंद वस्तू आणि ब्रांडेड रेडिमेड कपड्यांसारख्या वस्तूं खरेदी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दैंनदिन जीवनात आवश्यक या वस्तूंच्या महागाईचा फटका सगळ्यात जास्त सर्व सामन्यांना बसणार आहे.
दैनंदिन वस्तूवरील महागाई वाढण्यामागचं नेमकं कारण काय?
कोरोना महामारी नंतर दैनंदिन वापरातील वस्तू म्हणजे साबण, तेल, दंतमंजन, खाद्यतेल, पॅकेट बंद वस्तू हे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती सध्या वाढल्या आहेत. म्ह्णून या मालाच उत्पादन करणाऱ्या उत्पादकांनीही वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. वस्तूंच्या किमतीत वाढ करण्यात मोठमोठ्या विदेशी उत्पादकांचा समावेश आहे. या महागाईबाबत एफएमसीजी कंपन्यांनी स्प्ष्ट केले आहे की एकाएकी कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यांना नाईलाजाने या वस्तूंचे भाव वाढवावे लागले आहे.
(हे वाचा-आठवडाभरात गमावला 'सर्वात श्रीमंत व्यक्ती'चा मान, Elon Musk दुसऱ्या क्रमांकावर)
नेमकं काय काय महागलं?
चप्पल-जोडे, साबण -तेल, गारमेंट्स, अंडर गारमेंट्स, गीझर, टूथपेस्ट, डिसपोजल बॅग्सच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच फुटवेअर, गारमेंट, स्वयंपाक घरातील सामान, लगेज, हँड बॅग, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आयटम, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्सटाइल, बिल्डर हार्डवेअर, कागद, घरगुती वस्तू, फर्नीचर, लायटिंग, हेल्थ प्रोडक्ट्स, पॅकेजिंग प्रोडक्ट, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन ,घड्याळ , ज्वेलरी, स्टेशनरी, ऑटो पार्ट्स, चश्मे, टेपेस्ट्री मटेरियल इ. आणि आणखी बऱ्याच वस्तूंच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. एवढच नाही तर कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिनसह काही घरगुती उपकरणांच्या किंमतीही वाढ झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
(हे वाचा-कोरोनाचा परिणाम! आरोग्य क्षेत्रासाठी सरकार आणणार नवी फंड योजना)
महागाईवर काय म्हणालेत कॅटचे राष्ट्रीय मंत्री प्रवीण खंडेलवाल?
प्रवीण खंडेलवाल सांगतात कि प्रश्न हा नाही कि वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे पण खरा प्रश्न हा आहे कि वस्तूंच्या किमतीत एकाएकी झालेल्या वाढीमागचं नेमकं कारण काय? कोरोना महामारीनंतर सगळ्याच वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे तरीही वस्तूंच्या किमतीत वाढ होणं हि एक आश्चर्यचकित बाब आहे. बरेचदा कंपन्या स्वत: ची मनमानी करुन किंमती वाढवतात. पण या पुढे या वस्तूंच्या वाढीव किमतीचा निर्णय सरकारचा असावा. कंपन्यांना किंमती वाढवायच्या असतील तर कुठेतरी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असावे. तसेच कुठल्या वस्तूवरील किमतीत बदल करावा हा निर्णय खुद्द सरकारने घेणे आवश्यक आहे.