मुंबई, 12 ऑगस्ट: माणसाच्या पिढ्या बदलत राहतात आणि जीवन पुढे जात राहतं. आमची पिढी चांगली होती ही आताची पिढी (New Generation) ना फारच वेगळी आहे, असं आपण आधीच्या पिढीतील लोकांकडून बऱ्याचदा ऐकतो. पिढ्यांमधील अंतर किंवा वेगळेपणा संस्कृती, राजकारण, आर्थिक घटना आणि अनेक मुद्द्यांच्या आधारे मांडला जाऊ शकतो. तसं पहायला गेलं तर 1997 ते 2012 ला जन्मलेल्या पिढ्यांना (iGens) आय जनरेशन्सही म्हटलं जातं कारण iphone ही त्यांची तांत्रिक गरज झाली होती. पण आज आंतरराष्ट्रीय युथ डेच्या (International Youth Day 2021) निमित्ताने आम्ही 1981 ते 1996 या काळातील मिलेनियल्स आणि 1997 ते 2021 या काळात जन्मलेली जेन झेड (GenZ) या पिढ्या त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा कशा हटके म्हणजे वेगळ्या आहेत हे सांगणार आहोत. त्याबाबतचे हे 5 पाच मुद्दे. मिलेनियल अधिक सुशिक्षित पेव रिसर्च सेंटरच्या (Pew research Centre) अभ्यासानुसार मिलेनियलन्स त्यांच्या आधीच्या पिढीच्या तुलनेत अधिक चांगलं शिकलेले आहेत. आर्थिक मिळकतीचा विचार केला तर कॉलेजचं शिक्षण घेतलेल्यांना तसं शिक्षण न मिळालेल्यांच्या तुलनेत चांगले पैसे मिळतात. या आधीच्या पिढीची तुलना केली तर मिलेनियल्सच्या पिढीतील पदवी घेतलेल्या मुलीही त्याच पिढीतील पुरुषांपेक्षा अधिक पगाराची नोकरी करतात. हे वाचा- या गोष्टी मुलांपुढे चुकूनही नका करू; पालकच असतात मुलांचे पहिले गुरू तुलनेत मिलेनियल्सची संपत्ती कमी आहे आधीच्या पिढीकडे वयाच्या या टप्प्यावर जितकी संपत्ती होती त्याची तुलना केली तर मिलेनियल्सकडे (Millennials) तेवढी संपत्ती नाही. त्यातूनच त्यांची आर्थिक मिळकत लक्षात येते. अविवाहितांचं प्रमाण वाढलं 22 ते 37 या वयोगटातल्या अनेकांची लग्न झालेली नाहीत किंवा ते लग्नच करत नाहीत. तसंच घर घेणं किंवा प्रापंचिक गोष्टी मिळवण्याच्या बाबतीतही ही पिढी तशी सावकाशीने पावलं टाकते असंही निरीक्षण आहे. 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार दर पिढीमध्ये अविवाहित मुलं आणि मुलींची (Unmarried boys and girls) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर लग्न न करण्याचा हा पॅटर्न असाच सुरू राहिला तर ते त्यांच्या चाळीशी किंवा पंचेचाळीशीपर्यंत पोहोचेपर्यंत दर चौघांत एक जण अविवाहित असेल. ही आकडेवारी आतापर्यंतची अविवाहित राहणाऱ्यांची सर्वात अधिक आकडेवारी ठरेल. तरुणपिढी आई-वडिलांसोबत राहते त्यांच्या घरी घरं विकत घेण्याबाबत या संशोधनात एक वैशिष्ट्य दिसून आलं आहे की तरुणपिढी त्यांच्या आईवडिलांसोबत त्यांच्याच घरात दीर्घकाळ राहायलाच प्राधान्य देते आहे. हे वाचा- कसा असतो मृत्यू? मरणाच्या दारातून परत आलेल्यांचा थरारक अनुभव GEN Z चे तरुण आहेत खरे DIGITAL NATIVES Gen Z हेच खरे डिजिटल नेटिव्ह्ज (Digital Natives) आहेत. मिलेनियल्सचं म्हणाल तर त्यांनी लँडलाइन टेलिफोनपासून ते स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास अनुभवला आहे त्यामुळे त्यांनी दोन्ही काळातील सर्वोत्तम गोष्टी अनुभवल्या आहेत. पण Gen Z ही इंटरनेटच्या काळात लहानाची मोठी झालेली पिढी आहे. जेन झेड पिढीतील व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि टेक्नॉलॉजी (Platform & Technology) यातील बदल अगदी सहज स्वीकारते आणि नवनवी सॉफ्टवेअर्सपण लवकर शिकते. तंत्रज्ञान समजून घेण्याची त्यांची क्षमता आधीच्या पिढीच्या तुलनेत अधिक विकसित आहे, असं फोब्जच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.