संस्कारक्षम मुलं घडवणं हे एक कौशल्य आहे. त्यासाठी आईवडील दोघांनाही मेहत घ्यावी लागते. जास्त कठोरपणे वागल्यास मुलं कोमेजून जातात तर, मोकळीक दिल्यास बिघडात. त्यामुळे पालकांना याचा सुवर्णमध्ये काढावा लागतो.
2/ 11
मुलांना प्रेमापोटीही मारू नये. मारल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. उलट मूलं खोट बोलायला शिकतात. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन, तुला एकट सोडून देईल असं मुलांशी कधीही बोलू नका.
3/ 11
आई किंवा वडील दोघे नोकरी करत असतील तर, ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण, घरी येताना त्यांचे पालक म्हणून या. मुलांना कधीही नालायका, गधडा असे नकारात्मक शब्द वापरू नका. मुलांना घालून पाडून बोलू नका, मूलं तुमच्याकडे दुर्लक्ष करतील.
4/ 11
रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. मुलांनी चूक असेल तर लगेच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलंतर कौतुक करा.
5/ 11
मुलांना वेळ द्या. छोट्याछोट्या गोष्टीमधून प्रेम व्यक्त करा.रोज एका चांगल्या कामाची सवय लावा. त्याबद्दल मुलांसोबत बोला.
6/ 11
मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका. आपल्या मुलांची गरज समजुन घ्या, मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा.
7/ 11
कुठलीही नवी वस्तू विकत घेण्याच्या निर्णयात मुलाला समाविष्ट करून घ्या. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. त्याच्या विचारांना घरात महत्व आहे याची जाणीव होईल.
8/ 11
आई मुलांना जास्त जपते पण, त्यामुळे मुंलांच्या मनातली भीती निघुन जाणार नाही.
9/ 11
मुलांना जगात जगण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये बॉसने केलेला अपमान पचवून कशा प्रकारे काम करायचं हे त्यांना माहिती असायला हवं. म्हणजे त्यांना अपयश पचवण्याची आणि लढण्याची ताकद येईल.
10/ 11
मुल हट्टी असतील तर त्यांच्यावर चिडू नका. त्यामुळे त्यांचा राग आणखीन वाढेल. मुलांबरोबर बोलण्यासाठी वेळ काढा, त्यांना फिरायला घेऊन जा.
11/ 11
पालक मुलांसाठी खरे रोल मॉडेल असतात. ते त्यांच्याकडे बघुनच सगळं काही शिकत असतात. त्यामुळे मुलांच्या चांगल्या गुणांचे गुरू व्हा.