Home /News /lifestyle /

कसा असतो मृत्यू? मरणाच्या दारातून परत आलेल्यांचा थरारक अनुभव

कसा असतो मृत्यू? मरणाच्या दारातून परत आलेल्यांचा थरारक अनुभव

मृत्यू कसा दिसतो?

मृत्यू कसा दिसतो?

मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा कित्येक वर्षांपासून आत्म्यासोबत असलेल्या शरीराला कसं वाटत असेल, असा प्रश्न कधी तरी पडला असेल ना?

ब्रिटन, 12 ऑगस्ट : काही जण म्हणतात, की मृत्यू म्हणजे एक विचित्र अनुभव असतो. काही लोक असंही म्हणतात, की मृत्यू म्हणजे सुंदर फुलांनी भरलेलं एक शेत असतं. आपला मृत्यू झाल्यानंतर आत्मा कोणत्या जगात जातो, हे आजवर कोणालाच माहिती नाही. मृत्यूची घडी जवळ येते, तेव्हा कित्येक वर्षांपासून आत्म्यासोबत असलेल्या शरीराला कसं वाटत असेल, असा प्रश्न कधी तरी पडला असेल ना? मृत्यूचा अनुभव कसा असतो, त्याविषयी थोडं जाणून घेऊया. काही जण भयानक अपघातासारख्या दुर्घटनेमुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले असतात. मृत्यूचा अनुभव किती भयानक असू शकतो, हे अशा लोकांना चांगलंच माहिती असेल. अशा वेळी काहीं जणांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण जीवनपट फिरतो. काहींना या वेळी देवाचं दर्शन होऊ लागतं. लंडनच्या गोल्डस्मिथ्स युनिव्हर्सिटीतले (Goldsmiths University of London) मानसशास्त्राचे (Psychology) प्राध्यापक ख्रिस फ्रेंच यांनी मृत्यूशी संबंधित काही बाबी सादर केल्या आहेत. या बाबी मृत्यूचा अनुभव जवळून घडवून देऊ शकतात. हे वाचा - कधी हे ऐकलं होतं का? प्रत्येक अवयवासाठी असतो वेगवेगळा आहार ख्रिस फ्रेंच (Chris French) म्हणतात, की मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या बहुतांश लोकांना लांब बोगद्यातून तेजस्वी प्रकाश येत असल्याचा अनुभव आला. मृत्यूची भावना अमर्याद शांततेची आहे. कारण शरीर एका जगातून दुसऱ्या जगात प्रवेश करत असतं. या वेळी या जगातून गेलेले नातेवाईक, आध्यात्मिक आणि धार्मिक लोकांचीदेखील आठवण येते; मात्र या गोष्टींचा प्रत्येकाला अशाच प्रकारे अनुभव येतो असं नाही. काळ येऊन शरीराला स्पर्श करतो, म्हणजेच प्रत्यक्ष मृत्यूची वेळ येत असेल, तेव्हा त्या व्यक्तीला दुसऱ्या जगाची अनुभूती येते. हा अनुभव कोणाला शांततेचा वाटतो. काहींना या वेळी आसुरी शक्तींची जाणीव होते किंवा नरकात जाण्याचा भासही होतो. हे वाचा - धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं जगात मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन आलेले काही लोक आहेत. काही लोकांना जणू काही मिनिटांसाठी दुसऱ्या जगात जाण्याची संधीच मिळाली. यापैकी काही लोक भयंकर घाबरले होते, तर काही जणांना तिथून परत माघारी यायचं नव्हतं. आता सर्व काही संपलं आहे, आपण आता एकांतात जात आहोत, असं त्यांना मृत्यूच्या जवळ जाताना वाटत होतं. असा अनुभव घेतलेले लोक त्यांच्या आयुष्यात परत आल्यावर भौतिक गोष्टींपासून दूर गेले. त्यांनी अध्यात्माबद्दल अधिक विचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यामध्ये पूर्वी वाटत असलेली मृत्यूची भीतीदेखील उरली नाही. या बाबी प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणार नाहीत आणि खऱ्याही वाटणार नाहीत, हेही तितकंच खरं.
First published:

Tags: Dead body, Death, Lifestyle

पुढील बातम्या