मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

International Coffee Day: जगातली सर्वांत महागडी कॉफी कशापासून बनते वाचल्यावर बसेल धक्का

International Coffee Day: जगातली सर्वांत महागडी कॉफी कशापासून बनते वाचल्यावर बसेल धक्का

coffee day 2021: या खास दिवशी जाणून घ्या जगातल्या सर्वांत महागड्या, मौल्यवान कॉफीबद्दल. किंमत आहे 6000 रुपये एक कप. पण कशापासून तयार करतात ऐकल्यावर प्यावी वाटेल का तुम्ही ठरवा.

coffee day 2021: या खास दिवशी जाणून घ्या जगातल्या सर्वांत महागड्या, मौल्यवान कॉफीबद्दल. किंमत आहे 6000 रुपये एक कप. पण कशापासून तयार करतात ऐकल्यावर प्यावी वाटेल का तुम्ही ठरवा.

coffee day 2021: या खास दिवशी जाणून घ्या जगातल्या सर्वांत महागड्या, मौल्यवान कॉफीबद्दल. किंमत आहे 6000 रुपये एक कप. पण कशापासून तयार करतात ऐकल्यावर प्यावी वाटेल का तुम्ही ठरवा.

दिल्ली, 1 ऑक्टोबर: International Coffee Day च्या शुभेच्छा देण्याबरोबरच आज आम्ही सांगणार आहोत जगातल्या सर्वांत मौल्यवान आणि महागड्या कॉफीविषयी. कॉफीच्या आनंदासाठी काही लोक कितीही पैसे मोजायला तयार असतात. अशा खास कॉफी शौकिनांसाठी तयार केली जाते  Kopi Luwak. कॉपी लुवाकचा एक कप अमेरिकेत 6000 रुपयांना मिळतो. पण ही कॉफी केली जाते दक्षिण आशियात. भारतातही काही ठिकाणी होते. पण त्यात काय असतं? किंवा ती कशी तयार होते माहीत आहे का?

नेमक्या कोणत्या बाबीमुळे ती कॉफी एवढी खास बनते? हे कळलं तर तुम्हाला बसेल धक्का. तर, जगातल्या सर्वांत महागड्या कॉफीचं नाव आहे कोपी लुवाक. सर्वांत महत्त्वाची आणि विचित्र गोष्ट अशी, की मांजरासारख्या दिसणाऱ्या सिव्हेट (Civet) नावाच्या एका प्राणाच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. सिव्हेटपासून तयार होत असलेल्या या कॉफीला सिव्हेट कॉफी (Civet Coffee) असंही म्हटलं जातं. सिव्हेट ही मांजराचीच प्रजात आहे; मात्र सिव्हेटची शेपटी माकडांप्रमाणे लांब असते. परिसंस्थेचं (Ecosystem) संतुलन कायम राखण्यात या सिव्हेटचं योगदान महत्त्वपूर्ण मानलं जातं; पण मांजराच्या विष्ठेपासून कॉफी कशी तयार होत असेल, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येत असेल. याप्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या.

हे ही वाचा-  जमिनीखाली न्यूक्लियर बंकरमध्ये आहे आलिशान सुविधांचं पर्यटनस्थळ पाहा PHOTOS

तर, यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी, की हे सिव्हेट मांजर स्वतःच अस्सल कॉफी प्रेमी आहे. कॉफी चेरी म्हणजे कॉफीची फळं अर्धी कच्ची असतानाच सिव्हेट खाऊन टाकतं. या फळातला गर सिव्हेटला पचतो; पण ते फळ संपूर्ण पचवणं त्याला शक्य होत नाही. कारण त्यांच्या संपूर्ण पचनासाठी आवश्यक असलेली पाचक विकरं त्याच्या आतड्यांत तयार होत नाहीत. त्यामुळे या मांजराच्या विष्ठेतून न पचलेली कॉफीची फळंही बाहेर येतात.

ती फळं गोळा करून शुद्धीकरण केलं जातं. सर्व प्रकारच्या जंतूंचा नाश केल्यानंतर त्यावर पुढची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान कॉफी बीन्स (Coffee Beans) भाजली जातात आणि त्यापासून नंतर कॉफी तयार होते.

यापुढचा प्रश्न मनात येऊ शकतो, तो म्हणजे या सिव्हेटच्या विष्ठेतूनच (Potty)ही कॉफी बीन्स का घेतली जातात. थेट कॉफीबीन्सही घेता येऊ शकतात; पण तसं नाही. कारण सिव्हेटच्या आतड्यांतून गेल्यानंतर त्यावर अनेक प्रकारच्या पाचक विकरांची प्रक्रिया होते. त्यामुळे त्याचा दर्जा सुधारतो आणि त्याची पौष्टिकताही कित्येक पटींनी वाढते.

हे ही वाचा-चुकूनही दह्याबरोबर खाऊ नयेत या वस्तू; होतील गंभीर परिणाम

नॅशनल जिऑग्राफिकच्या (NAtional Geographic) एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे, की सिव्हेटच्या आतड्यांतून गेल्यानंतर या बीन्समधल्या प्रथिनांच्या संरचनेत बदल होतो. त्यातली अॅसिडिटी अर्थात आम्लता निघून जाते. त्यामुळे उत्तम चवीचं पेयं तयार होतं. सिव्हेट कॉफी आखाती देशांत, अमेरिकेत आणि युरोपात प्यायली जाते. खासकरून तिथल्या गर्भ श्रीमंतांना या कॉफीचा शौक असतो.

भारतात कर्नाटकच्या कूर्ग जिल्ह्यात (Coorg) सिव्हेट कॉफी तयार केली जाते. आशियाई देशांपैकी इंडोनेशियातही (Indonesia) मोठ्या प्रमाणावर सिव्हेट कॉफीचं उत्पादन केलं जातं. पर्यटनाच्या बाबतीत विकसित होत असलेल्या इंडोनेशियात जंगली सिव्हेट मांजरांना कॉफीच्या निर्मितीसाठी कैद केलं जाऊ लागलं आहे. कॉफीच्या बागांच्या आजूबाजूच्या परिसरात या कॉफीची निर्मिती केली जाते. पर्यटकांना या ठिकाणी फेरफटका मारायलाही नेलं जातं. कॉफी निर्मितीला प्रोत्साहन मिळावं आणि पर्यटनही बहरावं यासाठी इंडोनेशियाचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळी उठल्यावरच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वीही प्यावं कोमट लिंबूपाणी

प्राणी हक्कांसाठी काम (Animal Rights)करणाऱ्या अनेक संस्थांनी अनेक वेळा या कॉफीनिर्मितीवर आक्षेप घेतला आहे. वर्ल्ड अॅनिमल प्रोटेक्शन्स (World Animal Protections)या लंडनमधल्या संस्थेने केलेल्या पाहणीत असं आढळलं होतं, की बाली देशात कॉफीच्या 16 बागांमध्ये अनेक सिव्हेट प्राण्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं. तो मुद्दासंस्थेने उजेडात आणला. त्यावर अॅनिमल वेल्फेअर (Animal Welfare)नावाच्या जर्नलमध्ये लेखही प्रकाशित झाला होता. आपल्याला स्वाद मिळण्यासाठी माणूस प्राण्यांवर कसे अत्याचार करत आहे,असा त्या लेखाचा रोख होता.

First published:

Tags: Coffee