मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सकाळी उठल्यावरच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वीही प्यावं कोमट लिंबूपाणी; काय होतो फायदा पाहा

सकाळी उठल्यावरच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वीही प्यावं कोमट लिंबूपाणी; काय होतो फायदा पाहा

लिंबू हा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो जेवणाबरोबर लिंबाचं सरबत बनवून पितात. लिंबामध्ये व्हिटॅमीन सी, ऍन्टिऑक्सिडन्ट असतात. लिंबू इन्युनिटी बुस्टर आहे. थकवा जाणवत असेल तर एक ग्लास लिंबाचं सरबत प्यायल्यास रिफ्रेश वाटायला लागतं.

लिंबू हा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो जेवणाबरोबर लिंबाचं सरबत बनवून पितात. लिंबामध्ये व्हिटॅमीन सी, ऍन्टिऑक्सिडन्ट असतात. लिंबू इन्युनिटी बुस्टर आहे. थकवा जाणवत असेल तर एक ग्लास लिंबाचं सरबत प्यायल्यास रिफ्रेश वाटायला लागतं.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट लिंबूपाणी प्यावं.

    मुंबई, 29 सप्टेंबर :  सामान्यपणे बरेच लोक वजन कमी करण्यासाठी (Drinking warm lemon water in morning) म्हणून सकाळी उठल्यानंतर कोमट लिंबूपाणी (Lemon water) पितात. पण रात्री झोपण्यापूर्वीही लिंबूपाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Drinking warm lemon water before sleeping) . तज्ज्ञांच्या मते, दररोज एक रात्री एक ग्लास कोमट लिंबूपाणी प्यावं आता यामागील नेमकं कारण काय आहे, त्याचे काय फायदे होतात, पाहुयात (Health Benefits of lemon water).

    दैनंदिन आहारातल्या भाज्या, फळं आपल्या आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असतात. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आजार (Disease) दूर ठेवायला मदत होते. लिंबू (Lime) त्यापैकीच एक. लिंबाचे अनेक फायदे आहेत. लिंबाचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये होतो. तसंच लिंबाचं लोणचं (Pickle), सरबत (Juice) बहुतेक सर्वांच्या आवडीचं असतं. लिंबू हे शरीराच्या दृष्टीनं खूप फायदेशीर मानलं जातं. `क` जीवनसत्त्वाचा (C Vitamin) महत्त्वाचा स्रोत म्हणून लिंबाचा वापर केला जातो. लिंबाचं सेवन अनेक प्रकारे होतं. लिंबू सोडा, सरबत, गरम पाणी आणि लिंबू हे त्यापैकीच काही प्रकार.

    मानवी शरीर सुमारे 60 टक्के पाण्यानं (Water) बनलेलं आहे. त्यामुळे पाणी हे शरीरस्वाथ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी शरीरातले विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. पाण्यामुळे केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. परंतु, पाण्यात लिंबाचा रस घालून ते प्यायल्यास त्याचा फायदा अधिक होतो. कारण लिंबूपाण्यामुळे शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहतं. लिंबातलं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी उपयुक्त असतं. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं.

    हे वाचा - गरम की थंड, अंघोळीसाठी कोणतं पाणी आहे योग्य? संशोधकांनी सांगितलं याचं हे उत्तर

    किडनी (Kidney) हा शरीरातल्या प्रमुख अवयवांपैकी एक. आरोग्यासाठी किडनीचं कार्य चांगलं राहणं आवश्यक असतं. एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास किडनी स्टोन (Kidney Stone) म्हणजेच मूतखड्याचा त्रास थांबू शकतो. लिंबातल्या सायट्रिक अॅसिडमुळे कॅल्शियम स्टोनची निर्मिती थांबते.

    गरम पाणी आणि लिंबू हे एक नैसर्गिक पेय आहे. तसंच ते नैसर्गिक माउथ फ्रेशनरदेखील (Mouth Freshener) आहे. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास तोंडाची दुर्गंधी रोखता येते. हे हायड्रेटिंग पेय तोंड आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतं.

    आरोग्याच्या बहुतांश समस्या खराब पचनक्रियेमुळं निर्माण होतात. अन्नाचं व्यवस्थित पचन झालं तर आजारी पडण्याची शक्यता कमी होते. झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते.

    रात्री झोपण्यापूर्वी हे पेय प्यायल्यास शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. लिंबू त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामुळे त्वचा चांगली मॉश्चराइज्ड राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीमुळे त्वचेचं (Skin) आरोग्य सुधारतं.

    हे वाचा - तुमचीही होतेय चिडचिड? हे उपाय पाहा करून राग होईल गायब

    हे पेय साखरविरहित असल्याने फॅट बर्निंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळे वजन कमी करण्याचं उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकतं. तसंच या पेयामुळे वजन नियंत्रणात (Weight Control) राहतं. एकूणच गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्याने अनेक फायदे होतात. स्वाथ्य चांगलं राहतं आणि आपण आजारांना दूर ठेवू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Health, Health Tips, Lifestyle