मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लठ्ठ होऊ म्हणून घाबरली इन्स्टाग्राम स्टार; सडपातळ झाली आणि जीवच गमावला

लठ्ठ होऊ म्हणून घाबरली इन्स्टाग्राम स्टार; सडपातळ झाली आणि जीवच गमावला

या इन्स्टाग्राम स्टारला एक मानसिक आजार होता, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

या इन्स्टाग्राम स्टारला एक मानसिक आजार होता, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

या इन्स्टाग्राम स्टारला एक मानसिक आजार होता, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

बर्लिन, 23 डिसेंबर : आपण स्लीम ट्रिम असावं असं प्रत्येक तरुणीला, महिलेला वाटतं. त्यासाठी त्या डाएट, व्यायाम, जीम, योगा, औषधं काय काय नाही करत. जर्मनीतील (germany) 24 वर्षांची जोसी मारिया. एक इन्स्टाग्राम स्टार (instagram star). तिलादेखील लठ्ठपणाची (obesity) भीती होती. तिची ही भीती म्हणजे एक मानसिक आजार (mental illness) होता आणि यामुळे ती इतकी सडपातळ झाली होती की तिचा मृत्यू झाला.

जोसी मारिया इन्स्टाग्रामवर फेमस होती. तिचे एक लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स होते. ती नेहमी आपल्या सडपातळ शरीराचे फोटो इआपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करायची. काही दिवसांपूर्वीच तिनं आपला असाच एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोसह तिनं आपल्या आजाराबाबतही माहिती दिली. तिला असलेला हा आजार म्हणजे एनोरेक्सिया.

जोसीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, "कित्येक वर्षांपासून मी एनोरेक्सिया (anorexia) आजाराशी झुंज देते आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठीच मी हा फोटो शेअर करते आहे. आपण कसेही दिसू स्वतःला लपवून ठेवण्याची गरज नाही. आपल्याला मानसिक समस्या का असेना आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करत राहायला हवी"

हे वाचा - ओढणी गुंडाळून सेल्फी घेण्याच्या नादात बसला गळफास; 12 वर्षांच्या मुलीचा गेला जीव

एनोरेक्सिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्ती आपलं खाणं मर्यादित करते. म्हणजे ती मोजकंच खातं. कारण त्या व्यक्तीला आपण लठ्ठ होऊ याची चिंता असते, यामुळे त्या तणावात होता. काही लोक यामुळे जास्त व्यायामही करतात. जर या आजारावर वेळीच उपचार झाले नाही तर डिप्रेशन येऊ शकतं. वजन अति कमी होण्याची समस्याही होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये हृदयाचे आजारही बळावू शकतात. एनोरेक्सियामुळे 10  पेकी एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचं जोसीनं सांगितलं होतं.

हे वाचा - 'वजनदार' व्यक्तींनो सावध राहा! लठ्ठपणामुळे आता संसर्गजन्य आजारांचाही धोका

काही दिवसांपूर्वीच जोसी आपला मित्र वंजा रसोवासोबत ग्रेन कॅनेरियामध्ये फिरायला गेली होती. तेव्हाच तिचं हार्ट फेल झालं आणि तिचा मृत्यू झाला. आज तकच्या रिपोर्टनुसार, वंजानं जर्मन वृत्तपत्र बाइल्डशी बोलताना सांगितलं की, जोसीनं फ्लाइटमध्ये बसण्यापूर्वी फक्त दोन कॉफी प्यायली होती. दोन दिवस तिनं काहीच खाल्लं नव्हतं. आपल्या मित्राच्या कुशीतच तिनं शेवटचा श्वास घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Obesity, Weight