Home /News /national /

ओढणी गुंडाळून सेल्फी घेण्याच्या नादात बसला गळफास; 12 वर्षांच्या मुलीचा गेला जीव

ओढणी गुंडाळून सेल्फी घेण्याच्या नादात बसला गळफास; 12 वर्षांच्या मुलीचा गेला जीव

पोलिसांना मुलीचा गळ्यात फास अडकवलेला फोटोही मिळाला आहे. टीनएजर्स आणि तरुणांमध्ये सेल्फीचं वेड उत्तरोत्तर वाढताना दिसत आहे. आगळावेगळा सेल्फी घेण्याच्या नादात हा असा जीवही जातो.

    इंदोर, 23 डिसेंबर : चित्रविचित्र पद्धतीने सेल्फी (selfie) घेण्याच्या नादात अक्षरशः जीवावर बेतणारे स्टंट करताना आपण अनेकांना वाचतो. हे करताना जीवावर बेतल्याच्या अथवा जीव गेल्याच्याही बातम्या नव्या नाहीत. अशीच एक घटना आता इंदोरमध्ये (Indore) समोर आली आहे. अवघ्या 12 वर्षाच्या मुलीचा सेल्फी घेताना जीव गेला आहे. ही मुलगी घरी खुर्चीवर उभी राहत गळ्यात ओढणीचा फास गुंडाळून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघडकीस आलं आहे. यादरम्यान तोल ढासळल्याने फास आवळला जाऊन तिचा जीव गेला. दैनिक भास्करनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, एरोड्रम ठाणे क्षेत्रात वैष्णोदेवी नगर इथं ही घटना मंगळवारी (22 डिसेंबर) घडली. अतुल सोलंकी आपली पत्नी, दोन मुली आणि आणि मुलासह राहतात. सोलंकी हे SAF मध्ये तर त्यांची पत्नी हायकोर्टात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. आयुषी सातव्या वर्गात शिकत असून घरातली मोठी मुलगी होती. मंगळवारी आई-वडील दोघेही कामावर गेले असताना दुपारी 4 वाजता लहान भाऊ आणि बहीण जवळच आजीच्या घरी गेले. आयुषी आपल्या खोलीत एकटीच होती. ती बराच वेळ बाहेर न आल्यानं आजी आयुषीच्या एका बहिणीसह तिथं पोचली. इथं मुलीला फासावर लटकत असलेलं पाहून त्यांना मोठा धक्का बसला. आजीनं हे वृत्त लगोलग आई-वडिलांना कळवत आयुषीला शेजाऱ्यांच्या मदतीनं खाली उतरवलं. आई-वडिलांनी घरी येत आयुषीला दवाखान्यात नेलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी माहिती कळताच घटनास्थळी येत प्रेत पोस्टमार्टमला नेलं. पोलिसांनी सांगितलं, घटनेमागचं कारण अजून समजलेलं नाही. मात्र प्राथमिक टप्प्यावर समोर आलेल्या माहितीनुसार, मुलगी गळ्यात फास टाकून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यानच फास आवळला गेल्याने तिचा मृत्यू ओढवला. तपासादरम्यान पोलिसांना मुलीचा गळ्यात फास अडकवलेला फोटोही मिळाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indore, Selfie

    पुढील बातम्या