मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चहावाला ते पंतप्रधान; मोंदीच्या प्रवासामुळे भारावलेली चहावाली निवडणूक रिंगणात

चहावाला ते पंतप्रधान; मोंदीच्या प्रवासामुळे भारावलेली चहावाली निवडणूक रिंगणात

'एक चहावाला पंतप्रधान झाला आहे. मग माझ्यासारखी 'चायवाली' (Chaiwali) गावाची प्रमुख का होऊ शकत नाही', असं म्हणत ही चहावाली निवडणूक लढवण्यास सज्ज झाली आहे.

'एक चहावाला पंतप्रधान झाला आहे. मग माझ्यासारखी 'चायवाली' (Chaiwali) गावाची प्रमुख का होऊ शकत नाही', असं म्हणत ही चहावाली निवडणूक लढवण्यास सज्ज झाली आहे.

'एक चहावाला पंतप्रधान झाला आहे. मग माझ्यासारखी 'चायवाली' (Chaiwali) गावाची प्रमुख का होऊ शकत नाही', असं म्हणत ही चहावाली निवडणूक लढवण्यास सज्ज झाली आहे.

लखनऊ, 12 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात चहा विकण्याचं कामही केलं आहे. त्यामुळे 'चहावाला पंतप्रधान झाला' अशा बातम्या त्यांनी पदाची शपथ घेतल्यावर सर्वत्र आल्या होत्या. त्यांच्या विरोधकांनी त्यांना यावरून लक्ष्यसुद्धा केलं. पण आपले पंतप्रधान त्यांच्या पूर्वायुष्यात चहावाले होते आणि आज त्यांनी या पदापर्यंतचा प्रवास केला आहे, ही गोष्ट अनेक देशवासीयांना प्रेरणा (Inspiring Story) देणारी आहे. उत्तर प्रदेशातल्या (UP) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) 35 वर्षांच्या मीनाक्षीनेही (Meenakshi) त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे आणि तीसुद्धा आता निवडणूक रिंगणात उतरली आहे.

गेली तीन वर्षे चहा विकणारी  मीनाक्षी ग्रामपंचायत निवडणुकीला (Panchayat Election) उभी राहिली आहे. तिने सरपंचपदासाठी (Sarpanch) उमेदवारी अर्ज भरला आहे. तिचा पती ज्ञानसिंग मेरठ विद्यापीठाचा पदवीधर आहे आणि मजुरीचं काम करतो.

चोरावाला (Chorawala) हे मीनाक्षीचं गाव. अनुसूचित जातींसाठी (SC)राखीव असलेल्या जागेवरून तीनिवडणूक लढवत असून तिच्या गावात साधारण सात हजार मतदार आहेत. नॅशनल रुरल लाइव्हलीहूड मिशन (NRHM) योजनेअंतर्गत मीनाक्षीला तीन वर्षांपूर्वी चहाचा स्टॉल (Tea Stall) उभारण्यासाठी साह्य मिळालं. तेव्हापासून ती चहा विक्रीचा व्यवसाय करत आहे.

हे वाचा - हनुमानाचा जन्म आमच्याच भूमीत! दोन राज्यांमध्ये पेटला वाद

'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासामुळे प्रेरित झाले आहे. त्यांच्या रूपाने एक चहावाला पंतप्रधान झाला आहे. मग माझ्यासारखी 'चायवाली' (Chaiwali) गावाची प्रमुख का होऊ शकत नाही,' असं मीनाक्षीने म्हटलं आहे.

मीनाक्षी अपक्ष (Independent Candidate) म्हणून या निवडणुकीला उभी राहिली आहे. आपल्याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसला तरी गावातले नागरिक आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास मीनाक्षी व्यक्त करते.

ज्ञानसिंग सांगतो, '2015 मध्ये गावकऱ्यांनी माझ्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलं. आता गावकऱ्यांनी तिला सांगितलं आहे, की एके काळी चहा विकत असलेले मोदीजी देशाचे पंतप्रधान बनू शकतात, तर ती निदान एका गावाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला तर नक्कीच उभी राहू शकते.'

हे वाचा - 100 वर्षांच्या महिलेची छेड काढल्याचा आरोपावरुन 70 वर्षाच्या वृद्धाची धिंड

गावकऱ्यांचा विश्वास पाठीशी असल्यामुळे मीनाक्षीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मीनाक्षीला तीन मुलं असून विजयाबद्दल तिला खात्री आहे. आपण निवडून आलो तर गावाचा विकास करू,अशी ग्वाही तिने दिली आहे.

महिलांना सक्रिय राजकारणात कायद्याने संधी उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी आत्ता आत्ता कुठे लोकांची त्यांच्याबद्दलची मानसिकता बदलू लागली आहे. अनेक गावांमध्ये महिलांनी सरपंच म्हणून किंवा अन्य पदांवरही चांगली कामगिरी करून दाखवली आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्येही महिलांचा सहभाग वाढू लागला आहे. मीनाक्षीसारख्या अधिकाधिक महिला राजकीय क्षेत्रात येतील,तेव्हा त्याचेचांगले परिणाम व्यापक स्तरावर दिसू लागतील.

First published:

Tags: Gram panchayat, Sarpanch election, Uttar pardesh