मराठी बातम्या /बातम्या /देश /100 वर्षांच्या महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरुन 70 वर्षांच्या वृद्धाची काढली अर्धनग्न धिंड

100 वर्षांच्या महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरुन 70 वर्षांच्या वृद्धाची काढली अर्धनग्न धिंड

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात (Ludhiana, Punjab) 100 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची  (100 year old woman) 70 वर्षाच्या वृद्धानं छेड काढल्याचं  (Molestation) प्रकरण समोर आलं आहे.

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात (Ludhiana, Punjab) 100 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची (100 year old woman) 70 वर्षाच्या वृद्धानं छेड काढल्याचं (Molestation) प्रकरण समोर आलं आहे.

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात (Ludhiana, Punjab) 100 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची (100 year old woman) 70 वर्षाच्या वृद्धानं छेड काढल्याचं (Molestation) प्रकरण समोर आलं आहे.

लुधियाना (पंजाब) 12 एप्रिल : पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात (Ludhiana, Punjab) 100 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची  (100 year old woman) 70 वर्षाच्या वृद्धानं छेड काढल्याचं  (Molestation) प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात आरोपी वृद्ध हा त्या महिलेचा नातेवाईक आहे. ही घटना समजाच महिलेच्या नातेवाईकांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या तोंडाला काळं फासलं. त्याच्या गळ्यात जोड्यांचा हार घातला. तसंच त्याला अर्धनग्न करुन त्याची परिसरात धिंड काढली.

ही घटना चार दिवसांपूर्वी झाली आहे. मात्र या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल (video viral) झाल्यानंतर सोमवारी याबाबतची माहिती समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून नातेवाईकांच्या विरोधात तक्रार दाखल करत तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात वृद्ध व्यक्तीच्या मुलानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार ' 70 वर्षांचा वृद्ध व्यक्ती घराच्या शेजारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गेला होता. त्या कार्यक्रमात दारु पिऊन तो घरी परतत असताना रस्त्यावरील त्याच्या मेव्हण्याची घरी गेला. त्या मेव्हण्याचा मृत्यू झाला आहे. त्याची 100 वर्षांची पत्नी अंगणात ठेवलेल्या पलंगावर झोपल्या होत्या.

त्यावेळी हा वृद्ध व्यक्ती दारुच्या नशेत असल्यानं त्यांच्या अंगावर पडला. महिलेच्या पुतणीनं हा प्रकार पाहताच तिनं छेड काढल्याचा आरोप करत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

हा आरडाओरडा ऐकूण या महिलेचे कुटंबीय तिथं जमा झाले. त्यांनी वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे कपडे फाडून त्याला अर्धनग्न केलं. तोंडाला काळं फासलं तसेच गळ्यात जोड्यांची माळ घालून त्या परिसरात फिरवण्यास सुरुवात केली. हे कौटुंबिक प्रकरण असल्यानं त्या भागातील लोकांनीही त्यामध्ये लक्ष दिलं नाही. महिलेच्या नातेवाईकांनी या वृद्धाला पोलिसांची धमकी देखील दिली. त्यानंतर त्याला बळजबरीनं वयोवृद्ध महिलेची माफी मागण्यास भाग पाडलं.

विवाहिता गळफास घेऊन आत्महत्या करत असताना सासरच्या मंडळींनी बनवला Live Video

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलील स्टेशनमध्ये या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन्ही पक्ष एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते सध्या परस्परांवर आरोप करत आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Punjab