जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Gas Cylinder वर कोड का लिहिला जातो? हे आताच माहित करुन घ्या नाहीतर होईल पश्चाताप

Gas Cylinder वर कोड का लिहिला जातो? हे आताच माहित करुन घ्या नाहीतर होईल पश्चाताप

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

खरंतर हा एक कोड आहे. ज्याचा अर्थ फारच कमी लोकांना माहित आहे. पण एक सुजाण नागरिक आणि ग्राहक म्हणून तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 29 नोव्हेंबर : सर्वांच्याच घरात महत्वाचा असलेला गॅस हा काही ठिकाणी पाईपलाईनद्वारे येतो किंवा मग काही ठिकाणी तो सिलेंडरमधून येतो. दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. ज्यामुळे गृहिणिंचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. पण असं असलं तरी देखील गॅस हे आपल्याला जीवनातील महत्वाचा भाग आहे. ज्यामुळे तुम्हाला त्याला पर्याय नाहीच. गॅस सिलेंडर घरी आला की गृहिणी बऱ्याचदा तो लिक तर नाही ना हे तपासतात आणि चेक करुन गॅस सिलेंडर घेतात. तुम्ही देखील तसं करत असाल तर चांगलंच आहे. पण तसं नसेल करत. तर तसं करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. कारण यामुळे गॅस सिलेंडरमुळे होणाऱ्या घटना तुम्ही रोखू शकता. हे ही वाचा : आजपर्यंत शंभरदा बोलला असाल ‘टचवूड’, पण असं का बोलतात माहितीय? या व्यतिरिक्त बरेच लोक हे सिलेंडचं वजन देखील चेक करतात, जेणेकरुन त्यांची फसवणूक होऊ नये. पण असं असलं तरी एका गोष्टीकडे आपण कधीही लक्ष देत नाही, ते म्हणजे या सिलेंडरवर लिहिलेले शब्द किंवा नंबर. खरंतर हा एक कोड आहे. ज्याचा अर्थ फारच कमी लोकांना माहित आहे. पण एक सुजाण नागरिक आणि ग्राहक म्हणून तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इतर सर्व गोष्टींप्रमाणे गॅस सिलेंडरचीही एक्सपायरी डेट असते आणि तेच या सिलेंडरवर लिहिलेलं असतं. तुम्ही जर नीट पाहिलं तर सिलिंडरवर A, B, C आणि D लिहिलेलं असतं आणि त्यासोबत अंक देखील लिहिलेले जातात. उदाहरणार्थ A-२३, B-२४ किंवा फिक C-२५ असे लिहिलेले अंक तुम्ही पाहिले असतील. या इंग्रजी शब्दांचा नेमका अर्थ काय? A, B, C आणि D हे शब्द महिने दर्शवितात. A- जानेवारी ते मार्च महिना दर्शवते. B पुढील महिने, म्हणजेच एप्रिल ते जून हे महिने. C म्हणजे जुलै ते सप्टेंबर हे महिने आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हे महिने दर्शवते. A, B, C आणि D या अक्षरांच्या पुढेही काही संख्या लिहिल्या जातात. हे आकडे सिलिंडरची मुदत संपण्याच्या वर्षाविषयी सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ, जर तुमच्या गॅस सिलेंडरवर C-23 लिहिलेलं असेल तर तुम्हाला समजतं की, तुमचा एलपीजी सिलेंडर 2023 साली जुलै ते सप्टेंबर दरम्यान संपेल किंवा D-22 लिहिलं असेल तर तो ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 म्हणजे याच वर्षी संपेल. म्हणजेच तुम्हाला जर आता घरी D-22 सिलेंडर आला असेल तर त्याची एक्सपायरी डेट जवळ आली आहे असं समजा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात