इंदौर, 27 सप्टेंबर : कोरोनाच्या या परिस्थिती मृतदेह (deadbody) अदलाबदल झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशी घटना पुन्हा घडली आहे ती इंदौरच्या ग्रेटर कैलाश हॉस्पिलमध्ये. सामान्य रुग्ण आणि कोरोना संक्रमित रुग्णाची मृतदेहाची अदलाबदल झाली आणि त्यामुळे दोन्ही कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय काही जणांना आता कोरोनाचा धोकादेखील आहे.
खंडवामध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचा रुग्णालयात रात्री मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह सकाळी त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला. अॅम्ब्युलन्समधून मृतदेह घेऊन नातेवाईक 60 किलोमीटरपेक्षा जास्त दूरपर्यंत गेले. बडवाह आणि सनावदच्या दरम्यान अॅम्ब्युलन्स पोहोचली आणि तेव्हा रुग्णालयातून फोन आला. रुग्णालयाने फोनवर जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
हे कुटुंब अॅम्ब्युलन्समधून कोरोना संक्रमित मृतदेहासह होते. महूमध्ये राहणाऱ्या कोरोनाग्रस्त वृद्धाचा तो मृतदेह होता. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळ चुकीने मृतदेहाची अदलाबदली झाली होती. जेव्हा कोरोना संक्रमित वृद्धाचा मृतदेह घेण्यासाठी त्याचं कुटुंब रुग्णालयात पोहोचलं तेव्हा रुग्णालायचा हा भोंगळ कारभार समोर आला. रुग्णालयात असलेला मृतदेह खंडवातील व्यापाऱ्याचा तर खंडवातील कुटुंब जो मृतदेह घेऊन गेलं, तो कोरोना संक्रमित वृद्धाचा असल्याचं समजलं. यानंतर रस्त्यातच मृतदेहांची अदलाबदल करण्यात आली.
हे वाचा - खळबळजनक! हजारो सरकारी कामगारांना दिली कोरोनाची असुरक्षित लस
आपला रुग्ण नॉन कोव्हिड होता तरी त्याला कोव्हिड रुग्णालयात ठेवण्यात आल्याचा आरोप खंडवातील रुग्णाच्या कुटुंबाने केला आहे. दरम्यान आता ज्या व्यक्तींनी महूतील कोरोना संक्रमिताच्या मृतदेहासह प्रवास केला, त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका आहे. या मृतदेहासह दोन व्यक्ती आणि ड्रायव्हर होता.
हे वाचा - खळबळजनक! कोरोनाच्या धास्तीनं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची औरंगाबादेत आत्महत्या
आज तकच्या रिपोर्टनुसार आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी अमित मालाकार यांनी सांगितलं, ग्रेटर कैलाश हॉस्पिटलमध्ये एक मृतदेह कोरोना रुग्णाचा होता तर एक सामान्य रुग्णाचा. मात्र पॅकिंग करताना मृतदेहाची अदलाबदील झाली. त्यानंतर रुग्णालायनेदेखील आपली चूक कबूल केली आहे आणि मृतदेह योग्य ठिकाणी पोहोचलवले. यानंतर आणखी कुणाची तक्रार आलेली नाही. तक्रार आली तर योग्य ती कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.