नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : संपूर्ण जग कोरोनासारख्या अदृश्य व्हायरसमधून सावरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यात पुन्हा एक नवी भीती व्यक्त होत आहे ती कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची. ही शक्यता कितपत शक्य आहे याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने सध्या कमी झालेलं कोरोनाचं प्रमाण आणि दुसरी लाट याबाबत कोणतंही जाहीर वक्तव्य केलेलं नाही. इंडियन एकस्प्रेसने या समितीतील दोन तज्ज्ञांकडून संभाव्य दुसऱ्या लाटेबद्दल त्यांचं मत जाणून घेतलं.
केंद्र सरकारच्या समितीतील सदस्य प्रा. मनिंदर अग्रवाल म्हणाले, ‘ युरोपातील काही देशांत काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती तशीच परिस्थिती सध्या भारतात आहे. इटलीबाबतच म्हणायचं झालं तर तिथं विकसित झालेल्या तथाकथित रोगप्रतिकारशक्तीमुळे कोरोना खूप पसरला नाही. तिथं कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानी कमी झाली पण तिथं आता दुसरी लाट आली आहे. सगळ्या देशांत आणि प्रदेशांत कोरोनाची दुसरी लाट येईलच असं काही नाही. त्यामुळे जर भारतानी पुढचे काही महिने सगळी बंधनं पाळली तर नक्कीच याहून चांगली परिस्थिती असेल.’
वाचा-हे' कार्ड असेल तरच मिळणार Corona vaccine, पंतप्रधान मोदी यांनी दिले संकेत
याच समितीतील सदस्य, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापिका गगनदीप कंग म्हणाल्या, ‘सणासुदीचा काळ, हिवाळा आणि वाढणारं प्रदूषण यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. कोरोना महामारी आणि हिवाळा यांच्यातील संबंध अजून पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. इतर आजार आणि विषाणूंचा संसर्गा होण्याशी ऋतुबदलाचा संबंध असतो. इतर आजांराचा आणि विषाणूंचा हिवाळ्यात झालेला प्रसार लक्षात घेता या हिवळ्यात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता फेटाळून लावता येणार नाही.’
वाचा-कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का?
प्रदूषणाबद्दलही कंग यांनी आपलं मत व्यक्त केलं त्या म्हणाल्या, ‘आता अनलॉक झाल्यामुळे वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रदूषण वाढणार आहे. प्रदूषण हाही कोरोनाच्या संसर्गवाढीमध्ये महत्त्वाचा घटक ठरू शकतो त्यामुळे भारतात प्रदूषणाबाबत काळजी घ्यायला हवी. प्रदूषित हवेमुळे आधीच श्वसनाचे आजारा वाढले आहेत त्यामध्ये कोरोना परिस्थिती आणखी भयावह करू शकतो.’
वाचा-कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर
सुपर स्प्रेडर्सपासून रहा सावधान
सुपर स्प्रेडरपासून आपण सावध रहायला हवं असा इशारा अग्रवाल यांनी दिला. ते म्हणाले, ‘सुपर स्प्रेडर्स म्हणजे अनेकांना संसर्ग पोहोचवणाऱ्या व्यक्ती. संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात सुपर स्प्रेडर व्याधीग्रस्त झालेले असतात. त्यामुळे कदाचित काही सुपर स्प्रेडर व्याधीग्रसत झालेले असूही शकतील त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवून त्यांच्या बचाव करू शकता. तसंच त्यांच्यापासून सावधही रहायला हवं’. दरम्यान, दुसरी लाट याबाबत कोणतंही जाहीर वक्तव्य सरकारनं केलेलं नाही आहे.