COVAXIN किती कालावधीसाठी सुरक्षा देणार? स्वदेशी कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती समोर

COVAXIN किती कालावधीसाठी सुरक्षा देणार? स्वदेशी कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती समोर

भारतातील भारत बायोटेकनं (bharat biotch) तयार केलेल्या कोवॅक्सिन (COVAXIN) या कोरोना लशीचा (corona vaccine) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल कंपनीनं जारी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : पुढील वर्षात कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. मात्र ही लस किती काळ सुरक्षा देणार असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. आता मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. स्वदेशील कोरोना लस कोवॅक्सिन (COVAXIN) किती कालावधीसाठी सुरक्षा देऊ शकते, याबाबत माहिती समोर आली आहे. ही लस तयार करणाऱ्या हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीनं पहिल्यांदाच याची माहिती दिली आहे.

भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 लशीचा दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल जारी केला आहे. तसंच पहिल्या टप्प्यातील ट्रायलच्या परिणामाबाबतही अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हे वाचा - COVID-19: मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता

भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे. ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येऊ शकते, असं कंपनीनं पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालात म्हटलं होतं. यामुळे सरकारसमोर लस साठवण्याचं आव्हान नसेल. यामुळे लशीकरण मोहिमेअंतर्गत ही लस देशभरात सहजरित्या उपलब्ध करता येऊ शकते.

हे वाचा - लहान मुलांना कोरोना लस देता येणार नाही - हे आहे कारण

शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत ही लस नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल असं कंपनीनं याआधी सांगितलं होतं. दरम्यान भारत बायोटेकने लसीकरण सुरू करण्यासाठी तातडीने परवानगी देण्यासंदर्भात अर्ज केला आहे. गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे आला आहे. पण सध्या तरी लशीला आपात्कालीन परवानगी देण्याबाबत विचार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी याआधी दिली होती.

Published by: Priya Lad
First published: December 23, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading