नवी दिल्ली, 22 मार्च : उन्हाळा (Summer) सुरू झाला की, आरोग्याच्या काही समस्या नव्याने सुरू होतात. उष्णता, घाम, चिकटपणामुळं आपल्याला अस्वच्छ वाटू लागतं. नोकरी-व्यवसाय कामासाठी उन्हात घराबाहेर राहिल्यानंतर अनेकांना यादिवसात अंडरआर्म्समधून (Underarms) दुर्गंधी येऊ लागते. दुर्गंधी येत असल्याने आपला कॉन्फिडन्सही लूज होतो. कामाच्या ठिकाणी मित्रांमध्येही यामुळे आपल्याला लाजिरवाणं-अस्वस्थ वाटू लागतं. शिवाय आपल्या आजूबाजूच्या लोकांना यामुळे खूप त्रास होतो आणि त्यांना नाक मुरडण्याची संधी मिळते. उन्हाळ्यात अनेकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी सोपे उपाय जाणून घेऊयात. अंडरआर्म्सचा वास कसा घालवयाचा? झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, उन्हाळ्यात काखेतून घाम येणं ही सामान्य बाब आहे. परंतु जर जास्त प्रमाणात येऊ लागला तर तीव्र वास येऊ लागतो. आज आम्ही तुम्हाला यावरील काही उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. हे 7 घरगुती उपाय केल्यास फायदा होईल 1. अंडरआर्म्समधून दुर्गंधी दूर करण्यासाठी, काखेवर अॅलोवेरा जेल (Aloe Vera Gel) चोळा आणि सुमारे 30 मिनिटांनी भरपूर पाण्याने धुवा. 2. लिंबाच्या रसात (Lemon Juice) बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि अंडरआर्मवर 15 मिनिटे लावा. हे वाचा - म्हणून पुरेसं पाणी पिण्याची आपल्या आरोग्याला आहे गरज; अनेक आजार दूर राहतात 3. टोमॅटोचा रस (Tomato Juice) अंडरआर्म्सचा वास कमी करण्यासाठी प्रभावी आहे, हा रस 10 मिनिटे बगलेत ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. 4. ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) पाण्यात मिसळा, नंतर अंडरआर्मवर लावा आणि नंतर धुवा. 5. लॅव्हेंडर तेलाने (Lavender Oil) मसाज केल्यावर अंडरआर्म्सचा वास निघून जाईल. 6. अंडरआर्मला 15 मिनिटे खोबरेल तेलाने (Coconut Oil) मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर साबण आणि पाण्याने धुवा. हे वाचा - मुलाला लहानपणीच शिकवा या गोष्टी; आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सहज जाईल सामोरं 7. बटाटा (Potato) सोलल्यानंतर तो तुमच्या अंडरआर्ममध्ये घासून घ्या आणि काही वेळाने तो चांगला धुवा, त्यामुळे वास निघून जाईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.