मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मुलाला लहानपणीच शिकवा या गोष्टी; आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सहज जाईल सामोरं

मुलाला लहानपणीच शिकवा या गोष्टी; आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सहज जाईल सामोरं

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Parenting Tips: मुलांना सकारात्मक पद्धतीने विचार करायला आणि बघायला शिकवा. कोणत्याही समस्येबद्दल रडणे आणि शिव्या देण्याऐवजी सकारात्मक मार्गाने त्या सोडवायला शिकवा. ही सकारात्मकता तुमच्या मुलाला आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती देईल.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 मार्च : आई-वडिलांना नेहमीच आपल्या मुलांना सक्षम आणि चांगला माणूस बनवायचं (Good Human Being) असतं. त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपल्या मुलाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी, त्यांची चांगल्या पद्धतीनं काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी पालकांनी काही चांगल्या टिप्सचा अवलंब करायला हवा. या बातमीत दिलेस्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही आपल्या मुलांची चांगली काळजी घेऊ शकालच शिवाय त्यांना एक चांगली व्यक्ती देखील बनवू (Parenting Tips) शकता.

मुलांवर खूप प्रेम करा

हे 100 टक्के खरे आहे की प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात, परंतु बऱ्याच वेळा पालकांना त्यांचे प्रेम योग्यरित्या दाखवता येत नाही. विशेषतः वडील कधी-कधी आपल्या मुलाबद्दलचे प्रेम आपल्या मनात लपवून ठेवतात, ते तितकासा खुलेपणा आणत नाहीत. खरंतर प्रेमाची भावना मुक्तपणे बाहेर येऊ दिली पाहिजे. मुलांना एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी त्यांच्यावर खूप प्रेम करणं आवश्यक आहे.

मुलांचे विचार सकारात्मक करा

जीवनात समस्या येतात, वाईट प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक विचार करणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच मुलांना सकारात्मक व्हायला शिकवा. पालकत्वात स्वत: सकारात्मक व्हा आणि मुलांना सकारात्मक पद्धतीने विचार करायला आणि बघायला शिकवा. कोणत्याही समस्येबद्दल रडणे आणि शिव्या देण्याऐवजी सकारात्मक मार्गाने त्या सोडवायला शिकवा. ही सकारात्मकता तुमच्या मुलाला आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती देईल.

आपले उदाहरण व्हा

मुलांना कोणत्याही प्रकारचे धडे देण्यापूर्वी, स्वतः तसे वागण्याचा प्रयत्न करा. मुले अनेकदा त्यांच्या पालकांचे अनुसरण करतात. तुमचे आचरण चांगले असेल तर मुलांना ते अंगीकारणे सोपे जाईल.

मुलांशी बोला आणि त्यांना समजून घ्या

मुलांना त्यांच्या आवडीची खेळणी देण्यापेक्षा त्यांचे शब्द, समस्या आणि भावना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना समजून घेण्यासाठी, आपण त्यांच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना त्यांच्या प्रत्येक विषयावर त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी द्या. मुलांना चांगला माणूस बनवण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे.

हे वाचा - हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात ही फळं खायला हवीत; आहेत अनेक फायदे

आरोग्याची काळजी घ्यायला शिकवा

जर तुम्हाला तुमच्या मुलाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे वाटत असेल, तर त्यांना आरोग्याबद्दल चांगले समजावून सांगा. त्यांच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तसेच, आपल्या आरोग्याची देखील पूर्ण काळजी घ्या. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे पूर्ण लक्ष दिलेले बरे. जर तुम्ही स्वतः तुमच्या आरोग्याची काळजी घेतली तर तुम्ही निरोगी तर राहालच पण तुमच्या मुलांमध्येही आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होईल.

हे वाचा - सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टी खाण्याची सवय ताबडतोब सोडा; दुष्परिणाम खूप आहेत

मुलाला मारहाण करू नका

भारतात मुलांना मारहाण करणं किंवा काही तरी शिक्षा करणं हे अगदी कॉमन गोष्ट आहे. परंतु, शिक्षा करण्याऐवजी, मुलाशी बोलून त्याच्या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून तो पुन्हा असे करू नये. मुलांना मारहाण केल्याने त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो.

First published:

Tags: Lifestyle, Parents, Parents and child