मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

म्हैसूरमध्ये रावणाचा नव्हे तर या राक्षसाच्या मृत्यूवर साजरा होतो जगप्रसिद्ध दसरा

म्हैसूरमध्ये रावणाचा नव्हे तर या राक्षसाच्या मृत्यूवर साजरा होतो जगप्रसिद्ध दसरा

म्हैसूरमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो.

म्हैसूरमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो.

म्हैसूरमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 3 ऑक्टोबर : रावणाने रामावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दसऱ्याच्या दिवशी देशभरात दसरा साजरा केला जातो. असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. पण देशात अशीही एक जागा आहे, जिथे रावणावर विजय म्हणून हा उत्सव साजरा केला जात नाही. तर, महिषासुरच्या वधाच्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जातो. हा दसरा म्हैसूरमध्ये साजरा केला जात असून तो जगप्रसिद्ध आहे.

वास्तविक, म्हैसूर शहराचे नाव देखील महिषासुर या राक्षसाशी संबंधित आहे. प्राचीन काळी येथील राजा महिषासुर हा राक्षस होता, असे पौराणिक कथा मानतात. तो एक क्रूर राजा होता. त्याची प्रजा त्याच्या अत्याचाराला कंटाळली होती. त्याच्या दहशतीचे सावट होते.

महिषासुर हा महादेवाचा नित्सीम भक्त होता. शिवाची आराधना करून, त्याने वरदान प्राप्त केले होते. ज्यामुळे त्याला कोणीही देव किंवा मनुष्य मृत्यू देऊ शकत नव्हते. हे वरदान मिळाल्यानंतर तो आणखीनच दहशत माजवू लागला. परिणाम त्याच्या त्रासाला कंटाळून लोक भगवान शंकराच्या आश्रयाला गेले. त्यांनी महिषासुरापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली. महादेव विचारात पडले. कारण, ते वरदानाने बांधले होते. तेव्हा पार्वतीने दुर्गेच्या रूपात जाऊन महिषासुराचा वध करावा, अशी त्याची रणनीती आखली.

दहा दिवस माँ दुर्गेचे महिषासुराशी युद्ध चालू होते. ही लढाई चामुंडा या शहराच्या सर्वात उंच टेकडीवर झाल्यामुळे देवीला चामुंडेश्वरी देवी असेही संबोधले जाते. या युद्धात दहाव्या दिवशी चामुंडेश्वरी देवीने महिषासुराचा वध केला. तेव्हापासून हा दिवस येथे दसरा म्हणून साजरा केला जात होता. या दहा दिवसांत शहर उत्सवात न्हाऊन निघते. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या नगरीत महिषासुराचा वध पाहायला मिळतो.

चामुंडेश्वरी देवी ही म्हैसूरची देवी मानली जाते. म्हैसूरची समृद्धी आणि यशस्वी भाग्य चामुंडेश्वरी देवीशी जोडलेले आहे. जोपर्यंत येथे वाडेयर राजाची सत्ता होती, तोपर्यंत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या देवीच्या पूजेने होत असे. चामुंडा टेकडीवरील भव्य देवी मंदिरात जाऊन राजा सतत गुडघे टेकत असे. आजही दसऱ्याच्या दिवशी वाडेयर राजघराणे देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा करतात.

दसरा उत्सवाची सुरुवात 15 व्या शतकात विजयनगरच्या राजांपासून झाली. विजयनगर साम्राज्यात 14 व्या शतकात या उत्सवाची ऐतिहासिक भूमिका होती. त्याला महानवमी देखील म्हटले जात असे. वाडेयर राजांनीही ही परंपरा चालू ठेवली.

वाचा - Navratri 2022 : महानवमीचा उद्या मोठा उत्सव; नवरात्राच्या सांगतेसाठी होणार पूजा

एक कथा अशीही

महिषासुर हा निर्माता ब्रह्मदेवाचा महान भक्त होता. त्याला ब्रह्मदेवाचे वरदान मिळाले होते की कोणताही देव किंवा दानव त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही. महिषासुर नंतर स्वर्गातील देवतांना त्रास देऊ लागला. पृथ्वीवरही कोलाहल झाला. त्याने अचानक एकदा स्वर्गावर हल्ला केला. इंद्राचा पराभव करून स्वर्ग काबीज केला. देवांना तेथून हाकलण्यात आले. संकटात सापडलेला देवगण त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी पोहोचला. सर्व देवांनीही त्याच्याशी युद्ध केले पण त्यांचा पराभव झाला.

कोणताही उपाय न सापडल्याने, देवांनी दुर्गा, ज्याला चामुंडेश्वरी आणि पार्वती असेही म्हणतात, त्याच्या नाशासाठी निर्माण केले. देवीने महिषासुरावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी त्याला मृत्यूदंड दिला.

चामुंडेश्वरी देवीचे मंदिर कुठे आहे?

म्हैसूरपासून 13 किमी दक्षिणेला असलेली चामुंडा टेकडी हे म्हैसूरचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या टेकडीच्या शिखरावर चामुंडेश्वरी मंदिर आहे, जे दुर्गा देवीला समर्पित आहे. हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले. हे मंदिर दुर्गा देवीच्या महिषासुरावरच्या विजयाचे प्रतीक आहे.

First published:

Tags: Dasara, Karnataka