मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

LOCKDOWN मध्ये liquorची चिंता मिटली; रांगेत उभं राहणं सोडा, 'या' Appsच्या माध्यमातून घरबसल्या करा ऑर्डर

LOCKDOWN मध्ये liquorची चिंता मिटली; रांगेत उभं राहणं सोडा, 'या' Appsच्या माध्यमातून घरबसल्या करा ऑर्डर

घरबसल्याही तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता आणि तुमच्या दारात दारू पोहोचेल. यासाठी अनेक अॅप्स आणि वेबसाइट उपलब्ध आहेत. जाणून घ्या त्या अॅप्सविषयी...

घरबसल्याही तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता आणि तुमच्या दारात दारू पोहोचेल. यासाठी अनेक अॅप्स आणि वेबसाइट उपलब्ध आहेत. जाणून घ्या त्या अॅप्सविषयी...

घरबसल्याही तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता आणि तुमच्या दारात दारू पोहोचेल. यासाठी अनेक अॅप्स आणि वेबसाइट उपलब्ध आहेत. जाणून घ्या त्या अॅप्सविषयी...

  • Published by:  Meenal Gangurde

कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत एक आठवड्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दारूच्या दुकानांबाहेर मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळत आहे. मात्र घरबसल्याही तुम्ही दारूची ऑनलाइन ऑर्डर करू शकता. त्यामुळे तुम्हा लांबचं लांब रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही.

घरबसल्याही तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता आणि तुमच्या दारात दारू पोहोचेल. यासाठी अनेक अॅप्स आणि वेबसाइट उपलब्ध आहेत. जाणून घ्या त्या अॅप्सविषयी...

Living Liquidz

या अॅपच्या माध्यमातून तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता. हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून डाऊनलोड करू शकता. याच्या माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक दोन्ही ब्रँडच्या दारूची ऑर्डर करू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघऱ आणि बँगलोरसारख्या शहरात डिलिव्हरी मिळवू शकता. या अॅपच्या माध्यमातून दारूची ऑर्डर करण्यासाठी तुमचे वय 25 हून अधिक असावयास हवे. त्याशिवाय त्याच दिवशी तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकेल. याशिवाय तुम्ही कॉल करून, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून ऑर्डर प्लेस करू शकता. याशिवाय 5 रुपयात एका दिवसासाठी लायसेन्सदेखील खरेदी करू शकता.

HipBar

ही सर्विस 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. येथून तुम्ही बीयर, व्हीस्की, टकीला, रम, ब्रँडी, जिन, वाइन आणि व्होडकासह अनेक व्हरायटीची दारू खरेदी करू शकता. हे अॅप तुम्ही गूगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोअरवरुन डाउनलोड करू शकता. हे अॅप तुमच्या आजूबाजूच्या दारूच्या दुकानातून ऑर्डर घेऊन डिलिव्हरी करते. ज्यासाठी तुम्हाला अधिक पैसे आकारावे लागतील. ही सेवा कोलकाता, हावड़ा, सिलिगुड़ी, कटक, भुवनेश्वर आणि राउरकेला येथे उपलब्ध आहे.

Zomato

या अॅपच्या माध्यमातून भुवनेश्वर, कोलकाता, रांची, सिलिगुड़ी, झारखंड, ओड़िसा आणि पश्चिम बंगालचे लोक दारू ऑर्डर करू शकतात. झोमॅटोनुसार ऑर्डर केल्यानंतर 60 मिनिटात दारू तुमच्यापर्यंत पोहोचेल. मात्र ऑर्डर रिसीव करतेवेळी तुमची आयडी दाखविणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा-राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत

BeerBox

BeerBox हे aBEER द्वारा तयार करण्यात आलं आहे आणि तुम्ही यावर Yellow.chat मॅसेंजर, कॉल आणि वॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीचे ब्रँड सिलेक्ट करावा लागेल आणि आपला नंबर आणि पत्ता द्यावा लागेल. वेंडर तुम्हाला ब्रँडची माहिती देईल आणि त्यानंतर सहजपणे ऑर्डर करू शकता. दिवसभरात तुमच्यापर्यंत दारू पोहोचेल.

Swiggy

झोमॅटो प्रमाणे या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही भुवनेश्वर, कोलकाता, रांची, सिलिगुड़ी, झारखंड, ओड़िसा आणि पश्चिम बंगालमध्ये दारूची ऑर्डर करू शकता. या अॅपमध्ये तुम्हाला एक ‘Wine Shops’ नावाचा स्वतंत्र टॅब मिळेल आणि यावर लायसेन्स लिकर स्टोअर्सला लिस्ट करण्यात आलं आहे. तुम्ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर डिलिव्हरीदरम्यान आयडी प्रुफ दाखवून दारू घेऊ शकता.

liquorkart

या वेबसाइटच्या माध्यमातून हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये राहणारे नागरिक बियर, वोडका, वाइन आणि अन्य गोष्टीची ऑर्डर करू शकता. तुम्ही आवडीनुसार लिकर सिलेक्शन करू शकता आणि त्यानंतर लॉगिन करीत ऑर्डर करू शकता. या वेबसाइटवर तुम्हाला अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळतील.

CSMCL app

या अॅपच्या माध्यमातून छत्तीसगडचे नागरिक ऑनलाइन दारूची ऑर्डर करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून दारूची ऑर्डर केल्यानंतर सरकारकडून 120 रुपयांचं डिलिव्हरी चार्ज घेतला जातो.

या व्यतिरिक्त दिल्लीबद्दल सांगायचं झालं तर प्लेस्टोरवर  ‘Daru Baba – Home Delivery of liquor in Delhi NCR’ नावाचे एक अॅप आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता.

First published:

Tags: Apps, Corona virus in india, Liquor stock, Lockdown, Pandemic