जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अबब! दीड लाख रुपये किलोने विकलं जातं हे मशरूम; कॅन्सरवरही आहे उपयुक्त

अबब! दीड लाख रुपये किलोने विकलं जातं हे मशरूम; कॅन्सरवरही आहे उपयुक्त

मशरुम मधील काही गुण ट्युमर कमी करायलाही मदत करतात.

मशरुम मधील काही गुण ट्युमर कमी करायलाही मदत करतात.

जगातल्या या सर्वात महागड्या (The Most Expensive mushrooms) मशरुमचं उत्पादन गुजरात (Gujarat) मध्ये घेण्यात यश आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 22 मे : मशरुम (Mushroom**)** तसे सर्वांच्याच आवडीचे आहेत. मशरुमची भाजी, सुप किंवा अगदी पिझ्झा, पास्तामध्येही मशरुम वापरतात. मशरुम चवीला तर, चांगले असतात. त्याबरोबर हेल्दी (Healthy)ही असतात. त्यात एँटीऑक्सिडेंट(Antioxidant), एँटी डायबिटिक (Anti-diabetic)****, सुज कमी करणारे, कॅन्सररोधक (Anti-cancer)****, मलेरिया रोधक, थकवा कमी करणारे, HIV रोधक आणि ऍन्टीव्हायरल गुण असतात. हे सगळे गुण आरोग्याला हितकारक आहेत. मशरुम मधील काही गुण ट्युमर कमी करायलाही मदत करतात. ( कोरोनामुक्त कुटुंबातील चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात! जखडतोय विचित्र आजार ) आत्तापर्यंत तिबेट आणि चीनमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या मशरुमच्या या प्रजातीचा वापर नैसर्गिक औषधां (Natural **Medicine)**मध्ये केला जायचा. या मशरुमच्या जातीचं नाव  Cordyceps Militaris आहे. याच मशरुमला हिमालयातलं सोनं म्हटलं जातं. गुजरातमधल्या संशोधकांनी **(Researcher)**या जातीचं उत्पादन घेण्यात यश मिळवलेलं आहे. गुजरात इंस्टीट्यूट ऑफ डेजर्ट इकोलॉजी (GUIDE) च्या वैज्ञानिकांनी Cordyceps Militaris  जातीचे हे मशरुम लॅब मधल्या नियंत्रीत वातावरणात 35 जारमध्ये उगवले आहेत. त्यासाठी वैज्ञानिकांना 90 दिवसांचा कालावधी लागला आहे. या मशरुमला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रती किलो 1.50 लाख रुपये किंमत मिळते. ( मन नाही तर मेंदूत दडल्यात तुमच्या भावना; कायम आनंदी राहण्याचा समजून घ्या फंडा ) टाइम्‍स ऑफ इंडियाच्या हवाल्याने या संस्थेचे डायरेक्टर वी.विजय कुमार यांच्या मते, Cordyceps Militaris मशरुमचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असून, अनेक आजारांवरील उपायात वापरतात. शेतीसाठी प्रशिक्षण वैज्ञानिकांनी कोणत्या वातावरणात मशरुमची शेती करता येऊ शकते याचं संशोधन केलेलं आहे. आता भारतीय वातावरणात उगवलेल्या या मशरुममध्ये कॅन्सर विरोधी गुण सापडतात का ? या विषयी संशोधन केलं जाणार आहे. त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. ज्यांना मशरुमच्या या प्रजातीची शेती करायची असेल त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्यासाठी 1 आठवड्याच्या लॅब प्रशिक्षणासाठी 1 लाख रुपये शुल्क आकारलं जात. पण, संस्थेकडून कमी दरात प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ( Fungus मुळे लैंगिकदृष्ट्या उतावळा होतो हा जीव; 4-6 आठवडे संबंधांनंतर होतो मृत्यू ) कॅन्सर संदर्भात होणार संशोधन यात सापडणाऱ्या औषधी गुणांचा कॅन्सर सारख्या आजारात किती उपयोग होतो. याचं संशोधन केलं जाणार आहे. यातील ऍन्टीट्यूमर प्रॉपर्टीजचा अभ्यास केला जाणार आहे. कॅन्सर सारख्या आजारात ट्युमर कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो का ? हे पाहिलं जाणार आहे. कॅन्सरवर मशरुमचा अर्क परिणामकारक असल्याचा वैज्ञांनिकांच दावा आहे. प्रोटेस्ट कॅन्सर पेशींवर होणाऱ्या परिणामावरही अभ्यास सुरु आहे. मात्र, अद्याप माणसांवर याची टेस्ट होणं बाकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात