मुंबई, 05 सप्टेंबर : एखादं झाड (tree) उगवायचं असेल तर आपण त्या झाडाच्या बिया मातीत रुजवतो. मात्र एखादं कार्ड मातीत लावून झाड उगवणार असलं तुम्हाला सांगितलं तर थोडं आश्चर्य वाटेल. हो की नाही? असं कसं शक्य आहे? कार्ड लावून झाड कसं काय उगवेल? असे प्रश्न तुम्हाला पडले असती. मात्र एका IFS अधिकाऱ्याचं असं व्हिजिटिंग कार्ड (visiting card) आहे, जे मातीत लावल्यानंतर त्यापासून तुळस उगवते. आयएफएस अधिकारी परवीन कासवान (ParveenKaswan) यांचं हे व्हिजिंटिंग कार्ड. प्रवीण आपल्या सोशल मीडियावर प्राणी, पक्षी, निसर्ग याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. लोकांना पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठीदेखील ते प्रोत्साहन देत असतात. नुकतंच त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केलं आहे. एका हिरव्या रंगाच्या कार्डचा फोटो त्यांनी ट्विटवर टाकला आहे. हे कार्ड मातीत लावल्यानंतर त्यापासून तुळशीचं रोप उगवेलं असं त्यांनी सांगितलं आहे.
So now anybody coming to my office is getting this. This card when planted grows into a bright basal plant. Thanks @WildLense_India. pic.twitter.com/xL9xgPCbbF
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 1, 2020
परवीन कासवान यांनी ट्वीट केलं आहे की, “जो कुणी माझ्या कार्यालयात येईल त्याला हे कार्ड मिळेल. हे कार्ड जेव्हा मातीत लावलं जाईल तेव्हा त्यातून एक सुंदर तुळशीचं रोप तयार होईल. तुळशीचे खूप फायदे आहेत” हे वाचा - OMG! 4 लाख रुपयांचं इवलंसं रोपटं; खरेदीसाठीही ग्राहकांची भली मोठी लिस्ट तुम्ही या कार्डकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट तुम्हाला दिसून येईल. या व्हिजिटिंग कार्डवर तुम्हाला परवीन कासवान यांचं नाव, जी-मेल आयडी आणि खाली एका लाइनमध्ये सांगितलेल्या या कार्डच्या वैशिष्ट्याशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही.
“या कार्डवर मी कोणतीच माहिती किंवा माझा फोन नंबरही दिला नाही. कारण एका उद्देशाने मी हे कार्ड बनवून घेतलं आहे आणि ते म्हणजे ज्याला मी हे कार्ड देईन त्याने आपल्या घरी जाऊन कुंडीत ते लावावं. हे कार्ड म्हणजे माझ्याकडून एक गिफ्ट आहे”, असं त्यांनी सांगितलं. हे वाचा - केस कापण्याची हटके स्टाइल; VIDEO पाहून म्हणाल आपल्यालाही राव असाच न्हावी हवा नेटिझन्सना कासवान यांची ही आयडिया खूप आवडली आहे. अनेकांनी कसवान यांना हे कार्ड कुठून आणि कसं बनवून मिळालं याचीही विचारणा केली.
प्रवीण यांच्यासाठी हे कार्ड Wildsense ने तयार केलं आहे. याची सविस्तर माहिती आणि लिंकदेखील त्यांनी आपल्या ट्विटवर शेअर केली आहे.