Home /News /lifestyle /

OMG! 4 लाख रुपयांचं इवलंसं रोपटं; खरेदीसाठीही ग्राहकांची भली मोठी लिस्ट

OMG! 4 लाख रुपयांचं इवलंसं रोपटं; खरेदीसाठीही ग्राहकांची भली मोठी लिस्ट

लाखो रुपयांच्या या रोपट्यात नेमकं आहे तरी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? मग जाणून घ्या त्याची वैशिष्ट्यं.

    न्यूझीलंड, 04 सप्टेंबर : या फोटोत तुम्हाला जे छोटंसं रोपटं (little plant) दिसतं आहेत, त्याची किंमत चार लाख रुपये आहे, असं सांगितलं तर तुम्हाला धक्काच बसेल. बरं इतकी मोठी किंमत पाहून तुम्हाला वाटेल की फक्त या रोपट्यासाठी कोण बरं इतके पैसे खर्च करेल. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल भले या रोपट्याची किंमत इतकी असली तरी ते घेण्यासाठी ग्राहकांचीही कमी नव्हती. हे रोपटं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची भलीमोठी यादी लागली आणि जास्त किंमत देऊन एका ग्राहकाने हे झाड खरेदीदेखील केलं. न्यूझीलंडमधील (New Zealand) एका घरात लावललं हे छोटंसं रोपटं. न्यूझीलंडमधील वेबसाईट ट्रेड मी ने (trade me) हे झाड आपल्या वेबसाइटवर विकण्यासाठी टाकलं. जेव्हा या झाडाचा लिलाव सुरू झाला तेव्हा ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली. या झाडावर सर्वाधिक बोली लागली ती 8,150 न्यूजीलंड डॉलर्स म्हणजे  4.02 लाख रुपये. 4 लाखांपेक्षा अधिक किमतीला विकलं गेलं आहे. आणि आपल्याला हे रोपटं मिळालं याचा आनंद त्या ग्राहकालाही झाला आहे. त्याने हे रोपटं खरेदी करण्यासाठी अधिक किंमत दिली. हे वाचा - केस कापण्याची हटके स्टाइल; VIDEO पाहून म्हणाल आपल्यालाही राव असाच न्हावी हवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं या इवल्याशा रोपट्यात इतकं आहे तरी आहे. हे झाड म्हणजे राफिडोफोरा टेट्रासपेर्मा  (rhaphidophora tetrasperma). ज्याला फिलोडेंड्रॉन मिनिमा म्हणूनही ओळखलं जातं. हे दुर्मिळ असं झाडं आहे, खूप कमी प्रमाणात दिसतं. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला कधी पिवळी, कधी गुलाबी, कधी पांढरी, कधी जांभळी अशी वेगवेगळ्या रंगाची पानं येतात.हे झाड खरेदी करणारे लोक आपल्या मुलांप्रमाणे त्याची देखभाल करतात. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये या झाडाची सर्वाधिक मागणी आहे. हे वाचा - मुलांना शिकवण्यासाठी धडपड ते क्वारंटाइन सेंटरमध्ये मदत; शिक्षकही बनले Corona War ट्रेड मी ने जेव्हा या झाडाचा फोटो आपल्या वेबसाइटवर टाकला तेव्हा त्यांनी या झाडाबाबत माहिती दिली होती. आता या झाडाच्या प्रत्येक पानावर पिवळ्या रंगाची पानंही आहेत, जी चार आहेत. हिरव्या रंगाची पानं प्रकाश संश्लेषण करतात. तर फिकट पिवळ्या रंगाची पानं झाडाचा विकासासाठी आवश्यक शर्करा तयार करतात. तसंच पूर्णपणे हिरव्या खोडातून निघालेली ही परिवर्तनशील पानं भविष्यात किती वेगाने किंवा कोणत्या पद्धतीने विकसित होतील याची शाश्वती देता येत नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या