Home /News /lifestyle /

केस कापण्याची हटके स्टाइल; VIDEO पाहून म्हणाल आपल्यालाही राव असाच न्हावी हवा

केस कापण्याची हटके स्टाइल; VIDEO पाहून म्हणाल आपल्यालाही राव असाच न्हावी हवा

इतकं जीव ओतून केस कापताना (hair cut) तुम्ही कोणत्याच हेअरस्टालिस्टला (hair stylist) पाहिलं नसेल.

    मुंबई, 04 सप्टेंबर : सुरुवातीला घरोघरी न्हावी यायचे किंवा एखाद्या झाडाखाली न्हावी बसलेले असायचे. त्यांच्याकडून लोक केस कापून घ्यायचे. आता लोक सलूनमध्ये जाऊ लागले आहेत आणि प्रत्येकाचं एखादं सलून ठरलेलं असतं. याच सलूनमध्ये जाऊन आपण आपले केस कापायचे. इतकंच नव्हे तर आपले केस कोणाकडून कापून घ्यायचे हेदेखील आपण ठरवतो. कारण आपल्याला त्या हेअरस्टायलिस्टनेच केस कापलेले आवडतात. साहजिक हेअरकटिंग, हेअरस्टाइल ही हेअरस्टायलिस्ट किंवा हेअर कटिंग करणाऱ्यावर अवलंबून आहे. तो जितका आपला जीव ओतून केस कापेल तितके आपले केस आकर्षक आणि सुंदर दिसतील. सध्या अशाच एका हेअर स्टाइलिस्टचा  (hair stylists) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बार्बर हा आपल्या केस कापण्याच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. केस कापण्याच्या आपल्या खास अंदाजासाठी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होतो आहे. त्याने केलेला हेअरकट आणि हेअरकटचा त्याचा अनोखा अंदाच सर्वांना पसंत आला आहे. हे वाचा - फुगे बांधून पठ्ठ्यानं रचला वर्ल्ड रेकॉर्ड, 25 हजार फूटांवर जाऊन पोहचला अन्... व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात बार्बर सुरुवातीला ग्राहकाचे केस कापतो आणि पुन्हा त्याला प्रत्येक अँगलने पाहतो, की कुठे कमी तर राहिली नाही ना. बरं हा अँगल तिथल्या तिथं तपासत नाही तर अगदी सलूनमधील आपल्या प्रत्येक कोपऱ्यातून त्यानंतर सलूनच्या बाहेरून खिडकीतून हे कमी की काय म्हणून सलूनपासून काही अंतरावर दूर असलेल्या झाडाजवळ जाऊनदेखील ग्राहकाचे केस तपासतो. आपल्याकडून केस कापण्याक काही कमी तर राहिली नाही ना, हे तो तपासून पाहतो. हे वाचा - PUBG BAN मग काय झालं! पब्जीसारख्या 6 Games मध्ये दाखवा तुमची कमाल 2 सप्टेंबरला हा व्हिडीओ एका ट्विटर युझरने शेअर केला होता. त्याला 3 लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आणि एक लाखापेक्षा अधिक युझर्सनी रिट्वीट केलं आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. आपल्यालाही असा न्हावी हवा अशीच प्रतिक्रिया कित्येक युझर्सनी दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या