मुंबई, 21 फेब्रुवारी: घरातील अतिरिक्त सामान आपण कुठंही जागा मिळेल तिथं ठेवून देतो. अनेक वेळा लोक ज्या पलंगावर झोपतात त्याच्या आत किंवा खाली हे सामान ठेवतात. असं केल्यानं आपल्याला नुकसान सोसावं लागू शकतं, याची अनेकांना कल्पना नसते. वास्तविक, वास्तूशास्त्रानुसार, पलंगाच्या (Bed) आत किंवा खाली अशा काही गोष्टी आहेत, ज्या ठेवणं चांगलं मानलं जात नाही. वास्तुदोषामुळे पीडित व्यक्तीला आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. एवढेच नाही तर वास्तूशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं दीर्घकाळ आरोग्यावर परिणाम होऊ (Vastu Tips) शकतो. घर व्यवस्थित ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. पलंगाच्या संदर्भातही काही गोष्टी वास्तूशास्त्रामध्ये (Bedroom Vastu Tips) सांगण्यात आल्या आहेत. त्याविषयी जाणून घेऊया. इलेक्ट्रिक वस्तू टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, न वापरलेल्या विजेच्या वस्तू पलंगाखाली किंवा आत ठेवू नयेत, असं सांगितलं जातं. असं केल्यानं पीडित व्यक्तीला पैशाची कमतरता भासू शकते. एवढेच नाही तर या चुकीमुळं झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते. अशा परिस्थितीत अशा बंद इलेक्ट्रिक वस्तू फक्त स्टोअर रूममध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. झाडू अनेकदा लोक झाडूचे काम झाल्यानंतर झोपण्याच्या पलंगाखाली ठेवतात. असं करणं अनेक लोकांची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे एखाद्या मोठ्या वास्तुदोषापेक्षा कमी नाही. असं मानलं जातं की झाडू धनाची देवी लक्ष्मी देवीशी संबंधित आहे आणि झाडू पलंगाखाली ठेवल्यानं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. खरं तर बेडखाली झाडू ठेवल्यानं त्यावर पाय लागू शकतो. अशा परिस्थितीत झाडूचा अपमान होतो आणि यामुळे पैशाची कमतरता आणि नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत झाडू अशा ठिकाणी ठेवा, जिथे पाय किंवा कोणाला सहसा दिसणार नाही. हे वाचा - Vastu Tips: नवरा-बायकोमधील वाद, कुटुंब कलह नाहीसे होतील; या 10 वास्तू टिप्स ध्यानात ठेवा लोखंड अनेक वेळा लोक नकळत लोखंडी वस्तू पलंगाखाली किंवा आत ठेवतात. असे म्हटले जाते की, वास्तूनुसार असे करणे देखील अशुभ मानले जाते. जर तुम्हाला लोखंडी वस्तूंची गरज नसेल तर त्या विकून टाकाव्यात. जर तुम्हाला याची गरज भासत असेल तर ते घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे ते सहज वापरता येईल. हे वाचा - 31 दिवस धोक्याचे! या राशीच्या लोकांनी जरा जपूनच राहा; गुरू ग्रहाचा अस्त संकटं वाढवेल (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.