जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: बीडच्या शेतकऱ्याची परदेशात कमाल! द्राक्षं पोहचली थेट युरोपच्या बाजारपेठेत

Beed News: बीडच्या शेतकऱ्याची परदेशात कमाल! द्राक्षं पोहचली थेट युरोपच्या बाजारपेठेत

Beed News: बीडच्या शेतकऱ्याची परदेशात कमाल! द्राक्षं पोहचली थेट युरोपच्या बाजारपेठेत

लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला यंदा मात्र, थेट युरोपमधून सूर गवसला आहे. या शेतकऱ्याच्या बागेतील द्राक्षं युरोपच्या बाजारपेठेत (European Market) गेल्यामुळे 40 रुपये किलोऐवजी युरोपमध्ये 80 रुपये किलोने विकली गेली. त्यामुळे या शेतकऱ्याला 24 लाखांचे उत्पन्न मिळाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंबाजोगाई, 21 एप्रिल: येथील एका शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून द्राक्षाची बाग फुलवली होती. मात्र, गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन जाहीर झाला होता. त्यामुळे या शेतकऱ्याला तीन एकरांतील द्राक्षे (Grape Farming) स्थानिक व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना विकावी लागली. या टाळेबंदीचा मोठा फटका या शेतकऱ्याला बसला होता. गेल्या वर्षी केवळ आठ लाख रुपयांच्या द्राक्षांचे उत्पादन शेतामध्ये निघाले. खर्च मात्र पंधरा लाखांचा झाला होता. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने यंदा मात्र, थेट युरोपमध्ये द्राक्ष पोहोचवली आणि तीन एकरांतील वीस टन द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत (European Market) गेल्यामुळे द्राक्षं 40 रुपये किलोऐवजी 80 रुपये किलो दराने विकली गेली. त्यामुळे या शेतकऱ्याला 24 लाखांचे उत्पन्न मिळाले. पुस येथील रविकांत खानापुरे या शेतकऱ्याने गतवर्षी तीन एकरांमध्ये द्राक्षाची बाग फुलवली होती. द्राक्षाचा बहर येण्याच्या काळातच बरोबर देशासह जगावर कोरोनाचे (Corona in India) संकट ओढवले. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे शेतीमालासह विदेशात जाणाऱ्या फळ-भाज्या जागेवरच सडून गेल्या. टरबूज, खरबूज, आंबा आणि द्राक्षांसारखी फळे टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागली. त्यामुळे फळबाग करणारे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. दहा लाख रुपये खर्च करून पुस येथील शेतकऱ्याने गेल्यावर्षी तीन एकरात द्राक्षबाग फुलविली. विशेष म्हणजे द्राक्षे सेंद्रिय खतावर पिकवली असल्यामुळे या फळांनादेखील विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. (हे वाचा- 21व्या शतकातील राईट बंधूंचा क्षण! नासाच्या यशात भारतीय इंजिनीअरचा सिंहाचा वाटा ) परंतु, मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हवाई वाहतुकीसह सर्वच वाहतूक ठप्प  होती. फळविक्रेत्यांना खर्चदेखील निघणं मुश्कील झालं होतं. त्यातच काही शेतकऱ्यांना तर बहरात आलेली फळे रस्त्यावर फेकून देण्याची त्यांच्यावर वेळ आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनावरील लस (Coronavirus Vaccine) आल्याने आणि लोकांमध्ये जागृती झाल्याने यावेळी तेवढे निर्बंध नाहीत. शेतीमालासह फळ विक्रेत्यांना लॉकडाऊनमधून मुभा दिल्यामुळे पुसच्या या शेतकऱ्याचे द्राक्ष युरोपच्या बाजारपेठेमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी आठ लाखांच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी 24 लाख रुपयांचे उत्पन्न द्राक्षांमधून मिळाले आहे. … फळांच्या निर्यातीला सूट मिळाली नसती तर यावेळी फळ निर्यातीला मुभा मिळाली नसती तर फळबाग शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसता. मागील वर्षी विदेशात मागणी असणारी द्राक्षे स्थानिक पातळीवर अतिशय कमी किंमतीला विक्री करावी लागली. मात्र, वर्षभरातील खर्च या फळ विक्रीतून निघाला नाही. गतवर्षीचीच परिस्थिती यावर्षीही राहिली असती तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसता, असे शेतकरी यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात