नवी दिल्ली, 02 मार्च : मधुमेह (Diabetes) पूर्वी फक्त मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांनाच होत असे. मात्र, आता टाईप-2 मधुमेहानं (Type-2 Diabetes) ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. विशेषतः तरुणांमध्ये याचं प्रमाण वाढत आहे. यामागील कारणाविषयी बोलायचं झालं तर आरोग्यास अपायकारक जीवनशैली आणि लठ्ठपणामुळं हा विकार वाढतो आहे. टाईप 2 मधुमेहात शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा अन्नातून ग्लुकोजचं उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी इन्सुलिन योग्यरित्या वापरले जात नाही. मात्र, काही टिप्सच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मुलाला यापासून सुरक्षित ठेवू शकता. या मार्गांनी मुलांना ठेवा सुरक्षित 1) हिंदुस्थान टाइम्स ने दिलेल्या बातमीनुसार, बहुतेक मुलांना गोड खायला आवडतं. सोडा, ज्यूस, कँडीज, डोनट्स, पेस्ट्री, मिठाई आणि आइस्ड टी यासारखे मोठ्या प्रमाणात साखर असलेले पदार्थ खाल्ल्यानं वजन जास्त वाढू शकतं आणि लहान मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढू शकतो. हे पदार्थ कधीतरी थोड्या प्रमाणात खाल्ल्यानं फारसे हानिकारक ठरत नाहीत. याशिवाय, घरी काही मिठाई बनवल्यास अधिक चांगलं. मात्र, यात साखर आणि तेलकटपणाचं प्रमाण कमी ठेवावं. 2) तुमच्या मुलांना कमी स्निग्धांशयुक्त, पौष्टिक असलेले पदार्थ खायला द्या. यामध्ये अखंड धान्यं, कडधान्यं, शेंगा, ब्रेड, फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रथिनं यांचा समावेश करा. संतुलित आणि निरोगी आहार घेतल्यानं स्थूलपणा नियंत्रणात ठेवता येतो. लठ्ठपणा वाढणं टाइप-2 मधुमेहामध्ये धोकादायक ठरू शकतं. हे वाचा - तेल लावताना या चुका टाळायला हव्यात; केसांच्या अनेक समस्या नंतर सुरू होतात 3) अनेक मुलांचं वजन गरजेपेक्षा जास्त वाढलेलं आहे. हे मधुमेह होण्याचं मुख्य कारण आहे. म्हणूनच, लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या वजनावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांना पॅकेज केलेलं अन्न, जंक फूड देणं टाळा. तसंच, त्यांना शारीरिक व्यायाम करण्याची आणि मैदानी खेळ खेळण्याची सवय लावा. हे वाचा - तुम्हीही वारंवार चेहरा ब्लीच करताय का? त्याचे दुष्परिणामही वेळीच समजून घ्या 4) हल्ली मोबाईल फोन हा लहान मुलांच्या आयुष्याचा मुख्य भाग झाला आहे. अशा परिस्थितीत, मुलं दिवसभर फोन घेऊन न बसता, शारीरिक हालचाली, व्यायाम करण्यात सक्रिय राहतील याकडे लक्ष द्या. मुलांना टीव्ही पाहणं, कॉम्प्युटरवर वेळ घालवणं किंवा व्हिडिओ गेम खेळणं अशा कामांमध्ये किंवा खेळांमध्ये घालवण्यासाठी किती वेळ द्यावा, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं ठरवा. या क्रियाकलापांमध्ये दिवसातील बराच वेळ घालवण्यामुळं शारीरिक हालचाली कमी होऊन वजन वाढू शकतं आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मुलाला दररोज काही मैदानी खेळ किंवा काही प्रकारचे शारीरिक व्यायाम जसं की धावणं, जॉगिंग करणं, पोहणं किंवा जिमला जाणं यासाठी प्रोत्साहन द्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.