Home /News /lifestyle /

Hair Care Tips: तेल लावताना होणाऱ्या या चुका टाळायला हव्यात; केसांच्या अनेक समस्या नंतर सुरू होतात

Hair Care Tips: तेल लावताना होणाऱ्या या चुका टाळायला हव्यात; केसांच्या अनेक समस्या नंतर सुरू होतात

Hair Care Tips: केसांना तेल लावल्यानं आपल्या डोक्याचे रक्त परिसंचरण सुधारतं. यासोबतच केसांना पुरेसे पोषण मिळण्यासही मदत होते. त्यामुळे केस मऊ आणि निरोगी राहतात. पण, काही प्रकारचे तेल चुकूनही केसांना लावू नये.

    नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : केस मऊ, सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी काही लोकांना सलूनमध्ये जाणं आवडतं, तर काही लोक घरगुती उपायांकडे लक्ष देताना दिसतात. तसेच केसांची काळजी घेण्यासाठी हेअर मसाज (Hair massage) देखील सर्वोत्तम उपाय आहे. सामान्यतः प्रत्येकजण केसांना तेल (Hair Oil) लावतो, परंतु काही लोक नकळत केसांसाठी चुकीचे तेल निवडतात. त्यामुळे केस गळणे, कोरडे आणि निस्तेज दिसणं अशा अनेक दुष्परिणामांना (Side Effects) सामोरं जावं (Hair Care Tips) लागतं. केसांना तेल लावल्यानं आपल्या डोक्याचे रक्त परिसंचरण सुधारतं. यासोबतच केसांना पुरेसे पोषण मिळण्यासही मदत होते. त्यामुळे केस मऊ आणि निरोगी राहतात. पण, काही प्रकारचे तेल चुकूनही केसांना लावू नये. त्यामुळे त्यांचा वापर केल्यास केसांच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. जाणून घेऊया केसांना कोणतं तेल लावणं घातक ठरू शकतं. एरंडेल तेल औषधी घटकांनी समृद्ध असल्याने एरंडेल तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु, हे तेल केसांवर वापर करणे तितकेच हानिकारक ठरू शकते. वास्तविक, एरंडेल तेल लावल्याने केस कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे केस दुखणे, केस गळणे, केसांचा गुंता आणि डोक्याच्या त्वचेची अ‌ॅलर्जी होऊ शकते. ऑलिव तेल ऑलिव्ह ऑइल सामान्यतः केसांसाठी आरोग्यदायी मानलं जातं. मात्र, त्याचा थेट केसांवर वापर करू नये. ऑलियुरोपियन ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळते. याव्यतिरिक्त ते कॉमेडोजेनिक देखील आहे. त्यामुळे केसांना ऑलिव्ह ऑईल लावल्याने केस जड वाटू लागतात. त्याच वेळी, त्वचेची छिद्रे बुजल्यामुळे, ते पिंपल्स आणि मुरुमांचे कारण बनते. मिनरल ऑयल मिनरल ऑयल सामान्य भाषेत खनिज तेल असेही म्हणतात. बहुतेक तेलांमध्ये खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण, पॅराफिन वॅक्स आणि पेट्रोलियम पदार्थ असलेले खनिज तेल टाळूसाठी हानिकारक ठरू शकते. याचा वापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळतात. हे वाचा - फुलांशी आहे या नावांचा थेट संबंध; मुला-मुलींच्या युनिक नावांची ही घ्या यादी कापूर तेल अनेकजण केसांना कापूर तेल लावतात किंवा तेलात कापूर टाकून केसांना लावतात. पण कापूर वापरल्याने डोक्याची त्वचा कोरडी होते. त्यामुळे पुरळ आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लिंबू तेल तसं बघाय गेलं तर तेलात लिंबाचा रस घालून ते लावल्यास कोंडा कमी होतो. पण याच्या वापरामुळे केस पातळ आणि कोरडे होऊ लागतात. त्यामुळे कोरडे केस असल्यास लिंबाचा रस तेलात मिसळून लावणे टाळावे. हे वाचा - किडनी खराब होऊ लागल्याची अशी असतात 4 लक्षणं; त्वचेवरील या बदलांकडे दुर्लक्ष नको (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या