मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मोठं यश! लशीनंतर आता औषधही तयार; चाचणीचा एक टप्पा यशस्वी

कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मोठं यश! लशीनंतर आता औषधही तयार; चाचणीचा एक टप्पा यशस्वी

कोरोना रुग्णांना स्टेरॉईड देणं घातक

कोरोना रुग्णांना स्टेरॉईड देणं घातक

कोरोनावर लस (Corona vaccine) तयार केल्यानंतर आता भारताने कोरोनावरील औषधही (Anti corona drug) तयार केलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 23 एप्रिल : गेले वर्षभर कोरोनाशी (Coronavirus) लढा दिल्यानंतर या लढ्यातील सर्वात मोठं शस्त्र कोरोना लस (Corona vaccine) आली आणि आता आणखी एक शस्त्र कोरोनाचा खात्मा करायला तयार झालं आहे. हे शस्त्र म्हणजे कोरोनावरील औषध (Corona drug). हो कोरोनाविरोधी या युद्धात भारताने मेड इन इंडिया लस बनवल्यानंतर आता आणखी बाजी जिंकली आहे. ती म्हणजे कोरोनाविरोधातील औषध (Anti corona drug) तयार केलं आहे.

सध्या कोरोनावर वेगळं असं औषध उपलब्ध नाही. वेगवेगळ्या आजारांवरी औषधाचा वापर केला जातो आहे. लक्षणांनुसार कोरोना रुग्णांना औषधं दिली जात आहे. पण आता सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने (CCMB) विन्स बायोटेकसोबत मिळून अँटी कोरोना औषध तयार केलं आहे. विन्स बायोटेक ही विषावरील औषध तयार करणारी कंपनी आहे. अँटी कोरोना औषधाचं घोड्यांवर ट्रायल करण्यात आलं. ते यशस्वी झालं आहे. आता लवकरच या औषधाची मानवी चाचणीही सुरू केली जाईल.

हे वाचा - ऑक्सिजन कमतरतेच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; या उपयांकडे विशेष लक्ष द्या

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार CCMB चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितलं, त्यांनी जीनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये कोरोनाव्हायरस तयार केला आणि त्याला कल्चर केलं. त्यानंतर त्या व्हायरसला मृत केलं. या मृत कोरोनाव्हायरस घोड्यांमध्ये इंजेक्शनमार्फत सोडण्यात आला. त्यानंतर 15 ते 25 दिवसांत घोड्यामध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडी तयार झाला. 3 हजार घोड्यांवर ट्रायल घेण्यात आलं. जे पूर्णपणे यशस्वी झालं आहे. आता विन्स कंपनीने ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडे (DGCI) या औषधाच्या ह्युमन ट्रायलसाठी अर्ज केला आहे. याला लवकरच परवानगी मिळेल अशी आशा आहे.

अँटी कोविड ड्रग हे अँटी वेनम तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलं आहे. जसं एखाद्या सापावरील औषध तयार करण्यासाठी घोड्याच्या शरीरात सापाचं थोडंसं विष इंजेक्ट केलं जातं, त्याच्या शरीरात त्याविरोधात अँटिबॉडी तयार होतात आणि त्यानंतर घोड्याचं रक्त काढून अँटिबॉडी शुद्ध केले जातात आणि ते मग ज्या माणसाला साप चावला आहे, त्याला इंजेक्ट केले जातात, असं संशोधकांनी सांगितलं.

हे वाचा - वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 जणांवर अंत्यसंस्कार

माणसांमध्येही असा निष्क्रिय व्हायरस सोडून अँटिबॉडी तयार करता येऊ शकते पण त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात औषध बनवण्यासाठी इतकं रक्त काढू शकत नाही. पण घोड्याच्या शरीरातील खूप वेळा 2 लीटर रक्त काढता यऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात औषध तयार करता येऊ शकतं, असं संशोधक म्हणाले.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Covid-19, Medicine