मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खाकी वर्दीला सॅल्युट! स्वत:च्या मृत्यूनंतरही पोलिसाने वाचवला 8 जणांचा जीव

खाकी वर्दीला सॅल्युट! स्वत:च्या मृत्यूनंतरही पोलिसाने वाचवला 8 जणांचा जीव

पोलिसाच्या संपूर्ण कुटुंबानेच एक धाडसी निर्णय घेतला.

पोलिसाच्या संपूर्ण कुटुंबानेच एक धाडसी निर्णय घेतला.

पोलिसाच्या संपूर्ण कुटुंबानेच एक धाडसी निर्णय घेतला.

    हैदराबाद, 01 एप्रिल : काही मोजक्या भ्रष्ट पोलिसांमुळे अख्ख्या पोलीस खात्याला (Police Department) बट्टा लावला जात असला, तरी बहुतांश पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमच झटत असतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आपली जबाबदारी पार पाडत असतात. तेलंगणामधील (Telangana) एक पोलीस तर मृत्यूनंतरही जनतेसाठी धावून आला. त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांने घेतलेल्या एका निर्णयामुळे तब्बल 8 जणांचा जीव वाचला आहे.

    हैदराबादमधल्या (Hyderabad) सायबराबाद पोलिसातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महिपाल रेड्डी (mahipal reddy) यांचा नुकताच कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाला. 27 मार्च रोजी महिपाल रेड्डी निजामपेट (Nizampet) येथे कार्यरत असताना मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करत होते. त्या वेळी अचानक आलेल्या एका मद्यपान केलेल्या कॅब ड्रायव्हरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.

    त्यानंतर ड्युटीवर असलेल्या अन्य पोलिसांनी त्यांना तातडीने कोंडापूर इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली; मात्र ते मेंदूमृत अर्थात ब्रेन डेड (Brain Dead) झाले असल्याचं डॉक्टर्सनी घोषित केलं.

    त्यांच्या कुटुंबासाठी हा अत्यंत धक्कादायक आणि दुःखदायक क्षण होत. त्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र अशा प्रसंगीही त्यांनी आपल्या मोठ्या मनाचं आणि माणुसकीचं दर्शन घडवलं. त्यांनी खंबीर राहून आपल्या पोलीस मुलाचे अवयवदान करण्याचा (Organ Donation) निर्णय घेतला. त्यामुळे आठ जणांना जीवनदान मिळालं आहे.

    हे वाचा - आनंद महिंद्रांनी दिलेलं वचन पाळलं, नटराजनला दिलं स्पेशल गिफ्ट

    महिपाल यांची पत्नी अनिता, संदीप आणि प्रमोद हे त्यांचे दोन मुलगे, वडील सुरा रेड्डी आणि काका संजीवा रेड्डी हे त्यांचे नातेवाईक पुढे आले आणि त्यांनी महिपाल यांच्या अवयवांचं दान करण्याची इच्छा व्यक्त केली. जीवनदान ट्रस्टला (Jeevandan Trust) त्याची माहिती देण्यात आली. जीवनदान ट्रस्टतर्फे महिपाल यांचं हृदय, यकृत, मूत्रपिंडं, डोळे आणि फुप्फुसं या अवयवांचं आठ गरजू व्यक्तींच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आलं. त्यामुळे असाध्य विकार असलेल्या व्यक्तींना जीवनदान मिळू शकलं. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्यावर असलेल्या महिपाल यांच्या शरीरातल्या अवयवांनी त्यांच्या मृत्यूनंतरही आठ जणांना जीवनदान देण्याचं काम पार पाडलं.

    हे वाचा - अमरावतीच्या विपुलचा लंडनमध्ये मृत्यू, तब्बल 18 दिवसांनंतर गावात आले पार्थिव

    सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार (V. C. Sajjanar) यांनी महिपाल यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. असं  'आयबीटाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे. सज्जनार आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी महिपाल यांच्या पार्थिवाला स्मशानभूमीपर्यंत खांदा दिला. 'आयुक्त पदावरचा पोलीस अधिकारी जेव्हा अंत्ययात्रेत सहभागी होऊन पार्थिवाला खांदा देतो, तेव्हा त्यातून महिपाल यांच्याबद्दलचा आदर तर व्यक्त होतोच, तसंच अख्खं पोलीस दल त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही त्यातून दिला जातो,' अशी भावना एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

    First published:

    Tags: Hyderabad, Organ donation, Police