नटराजन आता सनरायजर्स हैदराबाद टीमशी जोडला गेला आहे. 2017 साली नटराजन पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला होता. त्यावेळी पंजाबकडून नटराजनला 6 मॅच खेळण्याची संधी मिळाली होती, यात त्याने दोनच विकेट घेतल्या. युएईमध्ये मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना त्याने 16 मॅचमध्ये 8.02 च्या इकोनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या.