नवी दिल्ली, 04 जून : देशात लहान मुलांमधील कोरोनाचा (Child corona vaccination) वाढता धोका लक्षात घेता आता लहान मुलांच्या लसीकरणासाठी धडपड केली जात आहे. लहान मुलांना लवकरात लवकर लस (Corona vaccine for child) मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत दिवसभरात आतापर्यंत तीन मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत.
लहान मुलांसाठी तीन कोरोना लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी भारतातच तयार करण्यात आलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोना लशीचा समावेश आहे. या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला DCGI ने काही दिवसांपूर्वीच परवानगी दिली आहे. याच महिन्यात हे ट्रायल सुरू होणार आहे. हे ट्रायल कधी पूर्ण होईल, याबाबत कंपनीने मोठी माहिती दिली आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
हे वाचा - 12 वीच्या विद्यार्थ्यांना कोरोना लस देणार का? मोदी सरकारने कोर्टात दिलं उत्तर
दरम्यान भारतातील आणखी एका कंपनीने आपल्या कोरोना लशीसाठी आपात्कालीन परवानगी मागण्याच्या तयारीत आहे. गुजरातची झायडून कंपनी दोन आठवड्यांत DCGI कडे आपल्या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करणार आहे. जर मंजुरी मिळाली तर झायडूस 5 कोटी डोस देणार आहे. ते लहान मुलांसाठी वापरता येतील, असं झायडूसनं सांगितलं आहे.
हे वाचा - खळबळजनक! कोरोना आता घेतोय प्राण्यांचाही जीव; कोविड पॉझिटिव्ह सिंहाचा मृत्यू
दरम्यान लहान मुलांना परदेशी लस देण्याचीही सरकारने तयारी केली आहे. अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फाझर व्हॅक्सीन (Pfizer Vaccine) ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे. ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार असल्याचे, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. फायझरची लस लवकरच भारतात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine