उठ ना रे! बहिणीची आर्त हाक ऐकून पुन्हा जिवंत झाला मृत भाऊ; पाहा चमत्कारिक VIDEO

उठ ना रे! बहिणीची आर्त हाक ऐकून पुन्हा जिवंत झाला मृत भाऊ; पाहा चमत्कारिक VIDEO

सावित्रीने ज्याप्रमाणे आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून आणले तसंच या बहिणीनेही जणू आपल्या भावाचे प्राण यमराजाकडून परत आणले आहेत.

  • Share this:

ब्रिटन, 31 मार्च : सावित्रीने आपला पती सत्यवानचे प्राण यमाकडूनही परत आणले होते हे आपणा सर्वांना माहितीच आहे. त्यावेळी पत्नीच्या प्रेमासमोर यमाचंही काही चाललं नाही. आता असंच काहीसं प्रत्यक्षात घडलं आहे, पण इथं नातं हे पती-पत्नीचं नाही तर भाऊ-बहिणीचं आहे. एका बहिणीची आर्त हाक ऐकून मृत भाऊ पुन्हा जिवंत झाला आहे. सावित्रीने ज्याप्रमाणे आपल्या पतीचे प्राण यमाकडून आणले तसंच या बहिणीनेही जणू आपल्या भावाचे प्राण यमराजाकडून परत आणले आहेत.

एखादा फिल्मी सीन वाटावा अशीच ही चमत्कारिक घटना घडली आहे ती ब्रिटनमध्ये. 18 वर्षांचा लेविस रॉबर्ट्सला कार अपघात झाला होता. 13 मार्चला त्याला एका गाडीने त्याला धडक दिली. डेली मेलच्या रिपोर्टनुसार त्याला एअर अॅम्ब्युलन्समधून रॉयल स्टोक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं. तेव्हा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  चार दिवस त्याच्यावर उपचार झाले. पण नंतर त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं.

आता आपला मुलगा तर आता या जगात नाही पण तो अवयव रूपात जिवंत राहू शकतो आणि इतरांचा जीवही वाचू शकतो, म्हणून लेविसच्या कुटुंबाने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच मोठा चमत्कार झाला. अवयवदानासाठी त्याचे अवयव काढले जाणारच होते. पण सर्जरीच्या काही तासांआधीच तो जिवंत झाला. श्वास घेऊ लागला.

हे वाचा - Shocking! डेंजर आइसलँडवर व्हॉलीबॉल; ज्वालामुखीतून धगधगता लाव्हा वाहू लागला आणि..

त्याची 28 वर्षांची बहीण जेड रॉबर्ट्सने हा चमत्कारिक व्हिडीओ आपल्या फेबुकवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं दिसतं आहे. सोबतच तिने भावुक पोस्टही लिहिली आहे.

पोस्टमध्ये जेडने सांगितलं, "भावाला शेवटचं पाहण्यासाठी त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आमचं संपूर्ण कुटुंबं रुग्णालयात गेलं होतं. मी त्याचा हात धरला आणि त्याला उठ ना रे असं म्हणत होती, परत येण्याची विनंती करत होती. गेले कित्येक दिवस मशीनवर ब्राऊन लाइन कधी दिसेल याची प्रतीक्षा आम्ही करत होतो. ज्यातून तो स्वतःहून श्वास घेतो आहे हे समजतं. पण इतके दिवस आम्हाला तसं काहीच दिसलं नाही. मध्यरात्री त्याचा हात हातात धरून मी breath Lewis असं म्हटलं आणि ब्राऊन लाईन दिसली. तो श्वास घेऊ लागला.  तरी यावर विश्वास बसत नव्हता. मशीनमध्ये काहीतरी समस्या असावी असंच वाटलं. हे शक्यच नाही असंच वाटलं"

हे वाचा - न्हाव्यानंतर आता थेट डेंटिस्टलाही धमकी; त्या CUTE मुलाचा नवा VIDEO पाहिलात का?

जेड नंतर घरी गेली आणि त्यानंतर तिला रुग्णालयातून फोन आला. जेडीला ज्यावर विश्वास बसत नव्हता ते खरंच झालं होतं. लेविस खरोखर जिवंत झाला होता. तो स्वतःहून श्वास घेत होता. ती पुन्हा रुग्णालयात गेली पण तरी तिला या चमत्कारावर विश्वास बसत नव्हता.

Published by: Priya Lad
First published: March 31, 2021, 6:21 PM IST

ताज्या बातम्या