Home /News /lifestyle /

तुमच्या बाळाला खूप स्वच्छ-स्वच्छ ठेवताय? प्रतिकारशक्तीवर होऊ शकतो असा परिणाम

तुमच्या बाळाला खूप स्वच्छ-स्वच्छ ठेवताय? प्रतिकारशक्तीवर होऊ शकतो असा परिणाम

योग्य वेळी लसीकरण मुलांना संक्रमणापासून वाचवते, तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पर्यावरण आणि निसर्गाशी संबंधित सूक्ष्मजीव प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत.

    नवी दिल्ली, 1 ऑक्टोंबर : बाळाचे तोंडात घालण्याचे टिथर असो किंवा त्याच्या सभोवतालची खेळणी, पालक (Parenting Tips) नेहमी ती स्वच्छ करून बाळाला देण्याचा प्रयत्न करतात. जरा जरी ते जमिनीवर पडले तर लगेच ते उकळलेल्या पाण्यातून धुवून घेतात. मुलाला आपण जमिनीवर पडलेले काहीही तोंडात घालू देत नाही. बाळाची (Small Baby) भरपूर स्वच्छता ठेवण्याकडे अनेक पालकांचे लक्ष असते. बर्‍याच लोकांना असं वाटतं की, जमिनीवर पडलेली एखादी वस्तू तोंडात घातल्यानं मुलाची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. अस्वच्छ काहीही मुलाने तोंडात घातल्यास रोगप्रतिकारक शक्ती बिघडू शकते. ज्यामुळे त्यांना संक्रमण किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, जर मुलांना सुरुवातीपासूनच जंतूंचा कमी संपर्क झाला तर संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. मात्र, यूसीएल आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांनी या युक्तिवादाला चुकीचे म्हटले आहे. हा नवा रिसर्च काय सांगतो - संशोधकांनी या नवीन संशोधनातून काही गोष्टी पुढे ठेवल्या आहेत. ज्यावरून मुलाच्या आरोग्यासाठी काय चांगले, काय वाईट समजणे आपल्यासाठी पुरेसे आहे. हे वाचा - …तर गाडीच्या इन्शुरन्ससाठी करता येणार नाही क्लेम, ‘या’ परिस्थितीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य वेळी लसीकरण मुलांना संक्रमणापासून वाचवते, तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पर्यावरण आणि निसर्गाशी संबंधित सूक्ष्मजीव प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत. मुलांना जमिनीवर पडून मुक्तपणे खेळण्यास आवडते. त्यांना तसे खेळण्यासाठी थोडे स्वातंत्र्य द्यायला हवे. स्वच्छता ठेवणं गरजेचं असलं तरी त्याचा अतिरेक उपयोगाचा नाही. मुक्तपणे खेळल्यानं ते थोडेे अस्वच्छ होईल, पण त्याला काही वेळा तसे करून देणेही त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या मुलांना मुक्तपणे खेळायचे असेल तर त्यांना थोडे स्वातंत्र्य द्या. त्यांना मुक्तपणे खेळू दिल्याने त्यांची हाडे मजबूत होतील. त्याच वेळी, त्याचे स्नायू देखील मजबूत होतील आणि तो आपले बालपण मुक्तपणे जगू शकेल. हे वाचा - पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड, पुण्यातील धक्कादायक घटना ( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Small baby

    पुढील बातम्या