जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care Tips: 'हे' घरगुती उपाय करा अन् चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मिळवा मुक्तता

Skin Care Tips: 'हे' घरगुती उपाय करा अन् चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मिळवा मुक्तता

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Skin Care: ही काही घरगुती पेयं प्यायल्याने चेहऱ्यावरची पिंपल्स आणि त्यामुळे होणारे डाग कमी होण्यास मदत होईल.

    नवी दिल्ली, 11 जून : मुरमं म्हणजे पिंपल्स (Pimples) ही चेहऱ्याच्या त्वचेची (Skin) सर्वांत मोठी समस्या आहे. त्यांचा केवळ सौंदर्यावरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे होणाऱ्या वेदनाही सहन कराव्या लागतात. पिंपल्सची समस्या ही त्वचेच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्वचेचं योग्य प्रकारे डिटॉक्सिंग होत असेल, तर ही समस्या रोखली जाऊ शकते. पिंपल्स सहसा खाण्याच्या सवयींमुळे आणि त्वचेच्या प्रकारामुळे होतात. मुरमांमुळे आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं आणि मग आपल्याला तो पिंपल्स असलेला चेहरा घेऊन सगळीकडे वावरायला कम्फर्टेबल वाटत नाही. शिवाय आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे आपलं नुकसान होतं. काही घरगुती पेयांच्या मदतीने आपण चेहऱ्यावरची पिंपल्स कमी करू शकतो. या संदर्भात माहिती देणारं वृत्त **‘ झी न्यूज हिंदी ’**ने दिलं आहे. कडुनिंब आणि मध (Neem and Honey) कडुनिंबाची चव कडू असली, तरी त्याचे अनेक फायदे आहेत. कडुनिंबाच्या पानांमध्ये असलेल्या औषधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरची पिंपल्स नाहीशी होतात. यासाठी कडुनिंबाची पानं त्यांचा रंग निघून जाईपर्यंत पाण्यात ठेवा आणि नंतर ते पाणी प्या. या पाण्याचा कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही त्यात मध मिसळू शकता. वाचा :  ऑईली असो की ड्राय, पुरुषांच्या त्वचेसाठी चंदनाचे हे 5 फेसपॅक आहेत सर्वोत्तम ग्रीन टी आणि लिंबू ग्रीन टी आणि लिंबाच्या (Green Tea and Lemon) मदतीने शरीराचं वजन कमी करता येतं हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या दोन घटकांच्या मदतीने पेय तयार केलं, तर त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड आणि पिंपल्स दूर होऊ शकतात. यासाठी ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस पिळून ते प्या. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे या दोन्हीचं मिश्रण करून ते पेय प्यायल्यास चेहऱ्यावरची पिंपल्स कमी होतील. वाचा :  दररोज फक्त गहू आणि ज्वारीचेच पीठ नको; निरोगी आरोग्यासाठी या 5 पिठांचाही करा वापर आवळा आणि आलं आवळा हे औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे. त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहकता-विरोधी गुणधर्म मुरमं तयार करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढतात. अद्रक म्हणजेच आलंही पिंपल्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा आणि आल्याचा रस एकत्र करून प्यायल्याने चेहऱ्यावर कमालीची चमक येते आणि पिंपल्स, तसंच चेहऱ्यावरचे डाग दूर होतात. ही काही घरगुती पेयं प्यायल्याने चेहऱ्यावरची पिंपल्स आणि त्यामुळे होणारे डाग कमी होण्यास मदत होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात