मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फुप्फुसांचं आरोग्य कसं सांभाळाल? या 5 सोप्या पद्धतींमुळे निरोगी राहाल!

फुप्फुसांचं आरोग्य कसं सांभाळाल? या 5 सोप्या पद्धतींमुळे निरोगी राहाल!

उत्तम आरोग्यासाठी (Health) सर्व अवयवांचं (Organs) कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण हात-पायासारख्या बाह्य अवयवांची काळजी घेतो, त्याप्रमाणे शरीरातल्या अंतर्गत अवयवांची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे.

उत्तम आरोग्यासाठी (Health) सर्व अवयवांचं (Organs) कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण हात-पायासारख्या बाह्य अवयवांची काळजी घेतो, त्याप्रमाणे शरीरातल्या अंतर्गत अवयवांची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे.

उत्तम आरोग्यासाठी (Health) सर्व अवयवांचं (Organs) कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण हात-पायासारख्या बाह्य अवयवांची काळजी घेतो, त्याप्रमाणे शरीरातल्या अंतर्गत अवयवांची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : उत्तम आरोग्यासाठी (Health) सर्व अवयवांचं (Organs) कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण हात-पायासारख्या बाह्य अवयवांची काळजी घेतो, त्याप्रमाणे शरीरातल्या अंतर्गत अवयवांची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. यामुळे आजार (Disease) दूर राहतात आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे काहीसं दुर्लक्ष होतं. त्यामुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वाढतं प्रदूषण, व्यसनांमुळे फुफ्फुसांचे (Lungs) आजार वाढले आहेत. फुफ्फुस हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. संपूर्ण श्वसनक्रिया (Respiratory function) या अवयवावर अवलंबून असते. अलीकडच्या काळात सर्दी, खोकल्यासह दमा आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरसारखे आजार वाढत आहेत. फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहवं यासाठी काही उपाय आवश्यक आहेत. व्यायामासारख्या सोप्या उपायांमुळे फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. `इंडिया डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. धूम्रपानासारखी व्यसनं आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे विकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना काळात फुफ्फुसांना संसर्ग होण्याचं प्रमाण लक्षणीय होतं. फुफ्फुसं आयुष्यभर निरोगी राहावीत, श्वसनासंबंधीचे विकार जडू नयेत यासाठी काही गोष्टी आवर्जून करणं गरजेचं आहे. धूम्रपानामुळे (Smoking) फुफ्फुसांचं मोठं नुकसान होतं. यामुळे कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपान टाळणं आवश्यक आहे. तसंच तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. किडनीला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी करा घरगुती उपाय; 'हे' डिटॉक्स ड्रिंक ठरतील फायदेशीर फुफ्फुसं मजबूत होण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी (Water) पिणं टाळावं. सर्वसामान्यपणे कोणत्याही व्यक्तीनं दिवसभरात आठ ते 11 ग्लास पिणं आवश्यक आहे. या प्रमाणात पाणी प्यायल्यास फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम राहतं. तुमच्या घराचा परिसर हिरवागार असणं फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. कारण ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यात झाडांची (Trees) भूमिका महत्त्वाची असते. तसंच झाडांमुळे विषारी घटक दूर राहतात. त्यामुळे तुम्ही जिथं राहता तिथं झाडं, हिरवळ असणं गरजेचं आहे. या 2 कारणांमुळे वाढते कॅन्सर होण्याची जोखीम; तुम्हीही यापैकी असाल तर आजच बदला सवयी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम (Exercise) गरजेचा असतो. व्यायाम केल्याने श्वसनयंत्रणा चांगली राहते. तसंच व्यायामाचा फुफ्फुसांवर सकारात्मक परिणाम होतो. यासाठी तुम्ही रोज अनुलोम-विलोम करू शकता. फुफ्फुसांसाठी हा उत्तम व्यायाम मानला जातो. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी व्यायामासोबत योग्य आहारही गरजेचा आहे. तुमच्या आहारात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिंडंटयुक्त पदार्थ समाविष्ट असणं आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये (Green Leafy Vegetables) हे सर्व घटक मुबलक प्रमाणात असतात. नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचं सेवन केल्यास फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. एकूणच या सर्व उपायांमुळे फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं आणि श्वसनाशी संबंधित विकारही दूर राहतात.

First published:

Tags: Disease symptoms

पुढील बातम्या