मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

किडनीला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी करा घरगुती उपाय; 'हे' डिटॉक्स ड्रिंक ठरतील फायदेशीर

किडनीला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी करा घरगुती उपाय; 'हे' डिटॉक्स ड्रिंक ठरतील फायदेशीर

 शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वूपूर्ण कार्य मूत्रपिंडांद्वारे केलं जातं. त्यामुळे किडनीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वूपूर्ण कार्य मूत्रपिंडांद्वारे केलं जातं. त्यामुळे किडनीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वूपूर्ण कार्य मूत्रपिंडांद्वारे केलं जातं. त्यामुळे किडनीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

     मुंबई, 8 ऑगस्ट-  शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वूपूर्ण कार्य मूत्रपिंडांद्वारे केलं जातं. त्यामुळे किडनीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तसं न झाल्यास किडनीचे विकार जडतात व जीवन अधिक त्रासदायक होतं. किडनीचं कार्य सुरळीत चालावं म्हणून त्यात साठलेले शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणारी पेय प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. ‘हर जिंदगी डॉट कॉम’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. किडनी हे व्यक्तीच्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. शरीरातील आवश्यक कार्य पूर्ण करण्यासाठी किडनीची मदत होते. दरदिवशी किडनीच्या माध्यमातून जवळपास 180 लिटर रक्ताचं शुद्धीकरण होतं. ज्याप्रमाणे एखादी गाळणी पाण्यातील कचरा दूर करून पाणी शुद्ध करते त्याप्रमाणे किडनी शरीरातील टाकाऊ, विषारी पदार्थांना बाजूला करत असते. अतिरिक्त पाणीही किडनीद्वारे बाहेर काढलं जातं. हे टाकाऊ पदार्थ आणि पाणी लघवीवाटे माणसाच्या शरीराबाहेर टाकलं जातं. किडनीच्या माध्यमातून इलेक्ट्रोलाइट्सला संतुलित करण्यासह हॉर्मोनचं उत्पादन आणि शारीरिक क्रियांचं कार्यही राखण्यासाठी मदत होते. संतुलित आणि आरोग्यदायी आहारासह स्वत: हायडेट्रेड राहणं किडनीला रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी आवश्यक आहे. किडनीचं कार्य सुरळीत चालावं म्हणून शरीराला पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे किडनी निकामी होण्यापासूनही वाचता येतं. वास्तविक पाहता केवळ पाणीच किडनीला डिटॉक्स करू शकत नाही. त्यामुळे डिटॉक्स पेय नियमित घेत राहायला हवीत. अशी काही महत्त्वाची पेय आहे जी किडनीतील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊ या. अॅपल सिडर व्हिनेगर किडनीचं कार्य व्यवस्थित चालावं म्हणून सफरचंदच्या बियांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सफरचंदाच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट आणि सिट्रीक अॅसिड मूत्रपिंडातील मुतखडा (Kidney Stone) नाहीसा करण्यासह विष काढण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. सफरचंदाच्या बियांपासून अॅपल सिडर व्हिनेगर हे डिटॉक्स पेय तयार करता येऊ शकतं. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर टाकावं आणि दररोज हे डिटॉक्स पेय घ्यावं, याचा चांगला फायदा होऊ शकतो. बिटाचा ज्युस किडनीच्या कार्यासाठी बीट महत्त्वाची भूमिका बजावतं. बिटच्या ज्युसमध्ये बिटामाइन असतं. ते एक फायदेशीर फायटोकेमिकल आहे. यात अँटिऑक्सिडंट गुण असतात. किडनीतील कॅल्शियम फॉस्फेट आणि स्ट्रूवाइट वाढत असताना बिटाचा रस घेतल्यास ते स्वच्छ करण्यासाठी मदत होऊ शकते. बिटच्या ज्युसमुळे किडनीतील विषारी घटक बाहेर पडतात व मुतखडा होण्याची शक्यताही कमी होते. बिटचा रस ग्लासमध्ये घेऊन त्यात थोडंसं लिंबू, आलं, कोथिंबिर आणि पुदिना टाकून हे पेय नियमित घ्यायला हवं. (हे वाचा:रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या 5 भाज्या आहेत सर्वोत्तम; आहारात घ्या ) क्रॅनबेरी ज्यूस क्रॅनबेरी या फळाचा ज्युस युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन थांबवण्यासाठी उपयोगी ठरतो. क्रॅनबेरी ज्युसमुळे अतिरिक्त कॅल्शियम ऑक्सालेट काढलं जाऊन किडनी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरतं. क्रॅनबेरी ज्युस प्यायल्याने किडनीतून विषारी घटक काढण्यासाठी मदतही होऊ शकते. डाळिंबाचा रस डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. त्यामुळे मुतखड्याचा आजार कमी करता येतो. पोटॅशियममुळे लघवीची आम्लता कमी होते व मुतखड्याचा आजार होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. डाळिंबाचा रस घेत राहिल्यास किडनीतील विषारी पदार्थ आणि कचरा शरीराबाहेर काढण्यास चांगली मदत होते. दररोज नियमित डाळिंबाचा ताजा रस काढून तो प्यायला हवा. (हे वाचा:Triphala Churna: मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर कंट्रोल, त्रिफळाचे फायदे, पण.... ) कोथिंबिर पेय कोथिंबिर फक्त जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर किडनीला डिटॉक्स करण्यासाठीही फायदेशीर आहे. यासाठी कोथिंबिर धुवून, बारीक चिरून घ्यावी त्यानंतर भांड्यात स्वच्छ पाणी व कोथिंबीर टाकून 10 मिनिटांपर्यंत उकळावं व ते पाणी थोडा वेळ थंड होऊ द्यावे. गाळणीने चाळून तो रस फ्रीजमध्ये ठेऊन द्यावा. दररोज एक ग्लास कोथिंबिरीचा रस प्यायला हवा. केवळ दोन दिवसांतच बदल घडत असल्याचा अनुभव आपण स्वत: घेऊ शकतो.एखादा आजार जडला की, वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार केले जातात. पण शरीरातील प्रत्येक अवयव चांगला राहावा म्हणून घरगुती सोपे उपाय केल्यास निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या