मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या 2 कारणांमुळे वाढते कॅन्सर होण्याची जोखीम; तुम्हीही यापैकी असाल तर आजच बदला सवयी

या 2 कारणांमुळे वाढते कॅन्सर होण्याची जोखीम; तुम्हीही यापैकी असाल तर आजच बदला सवयी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कॅन्सर होण्यामागे नेमकी कोणती कारणं (Causes) आहेत, याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. परंतु, अमेरिकेतल्या (America) एका संस्थेनं कॅन्सर होण्यामागे कोणती कारणं आहेत, याबाबत काही निष्कर्ष काढले आहेत

मुंबई 08 ऑगस्ट : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोग हा गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झाल्यास त्यावर उपचार प्रभावी ठरू शकतात. सर्जरी (Surgery), केमोथेरपी (Chemotherapy) आणि रेडिएशन थेरपीच्या (Radiation) सहाय्याने कॅन्सरवर उपचार केले जातात. कॅन्सरवर उपचार हे तुलनेनं महाग असतात. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना प्रसंगी कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कॅन्सर होण्यामागे नेमकी कोणती कारणं (Causes) आहेत, याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. परंतु, अमेरिकेतल्या (America) एका संस्थेनं कॅन्सर होण्यामागे कोणती कारणं आहेत, याबाबत संशोधन केलं असून, त्यातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. धूम्रपान (Smoking) आणि ज्येष्ठत्व (Old Age) हे कॅन्सरसाठी जोखमीचे घटक असल्याचं या निष्कर्षातून स्पष्ट झालं आहे. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. कॅन्सर म्हटलं की सर्वसामान्य माणसाची भीतीने गाळण उडते. कारण हा आजार जीवघेणा मानला जातो. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार हे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात असली तरी याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या (American Cancer Society) शास्त्रज्ञांनी कॅन्सर होण्यामागे कोणती कारणं आहेत, याविषयी एक संशोधन केलं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष समोर आले असून, त्यात धूम्रपान आणि ज्येष्ठत्व हे दोन घटक कॅन्सरसाठी सर्वाधिक जोखमीचे आहेत, असं दिसून आलं आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते. धूम्रपानाव्यतिरिक्त लठ्ठपणा, कौटुंबिक पार्श्वभूमी (Family History) हे घटक देखील वैद्यकीय तज्ज्ञांनी कॅन्सरच्या बाबतीत विचारात घ्यावे, असं या अभ्यासात म्हटलं आहे. Beauty Tips For Women In 50's : वयाच्या पन्नाशीतही दिसायचंय चिरतरुण? फॉलो करा ब्युटी टिप्स या संशोधनासाठी संशोधकांनी कॅन्सरचा कोणताही पूर्व इतिहास नसलेल्या अमेरिकेतल्या 4,29,991 स्वयंसेवकांचं विश्लेषण आणि अभ्यास केला. रजिस्ट्रेशन नंतर पाच वर्षांच्या आता या लोकांपैकी 15,226 जणांना आक्रमक कॅन्सरचं निदान झाल्याचं निष्कर्षावरून दिसून आलं. महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स अर्थात बीएमआय (BMI), डायबेटिस टाइप-2, हिस्टेरेक्टॉमी, कॅन्सरची कौटुंबिक पार्श्वभूमी, उच्च रक्तदाब, ट्यूबल लिगेशन आणि व्यायामाचा अभाव या गोष्टीदेखील कॅन्सरच्या जोखमीशी संबंधित असल्याचं संशोधनात दिसून आलं. ``सिंगल कॅन्सर प्रकार, विशिष्ट स्क्रीनिंग शिफारशी या विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरसाठी जोखमीच्या घटकांमध्ये समाविष्ट आहेत. आम्हाला दिसलेले निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत. कारण आम्ही सामान्य लोकसंख्येतील उपसमूह परिभाषित करण्यासाठी काम करत आहोत, ज्यांना कॅन्सरच्या तपासणी आणि प्रतिबंधाचा फायदा होऊ शकतो. भविष्यातल्या चाचण्यांमुळे कॅन्सरचे अनेक प्रकार ओळखता येतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे. कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होण्याचा सर्वाधिक धोका कोणाला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. या प्रकारचा डाटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही, परंतु, भविष्यातील स्क्रीनिंगसाठीच्या पर्यायांची माहिती देण्यासाठी तो निश्चितच आवश्यक आहे,`` अशी माहिती अमेरिकन कॅन्सर सोसायटीतील लोकसंख्या विज्ञान विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संशोधनाच्या प्रमुख लेखिका डॉ. अल्पा पटेल यांनी दिली. धूम्रपानाचं व्यसन आणि ज्येष्ठत्व या दोन घटकांमुळे कॅन्सर होण्याची जोखीम असते, असं या संशोधनाच्या निष्कर्षातून समोर आलं आहे.
First published:

Tags: Cancer

पुढील बातम्या