मशरूम खरेदी करताना अशी घ्या काळजी, नाही तर जाऊ शकतो जीव

मशरूम खरेदी करताना अशी घ्या काळजी, नाही तर जाऊ शकतो जीव

मशरूम पौष्टिक असतं. तब्येतीसाठी उत्तम आहे. पण तुम्ही मशरूम योग्य प्रकारे निवडलं नाहीत तर ते विषारी ठरतं.

  • Share this:

मुंबई, 04 जून : मशरूमला शाकाहारींचं चिकन म्हटलं जातं. कारण मशरूमची भाजी कलेजीसारखी लागते. मशरूम सॅलडमध्येही टाकलं जातं. त्याचं लोणचंही करतात. मशरूम पौष्टिक असतं. तब्येतीसाठी उत्तम आहे. पण तुम्ही मशरूम योग्य प्रकारे निवडलं नाहीत तर ते  विषारी ठरतं. जाणून घ्या मशरूम खरेदी करण्यासाठी कशी घ्यायची काळजी -

मशरूम खरेदी करताना त्याची छत्री गोलाकार आहे ना ते नीट पाहा. पांढरे, डागविरहित मशरूमच खरेदी करा. ताजे मशरूम मऊ आणि दिसायला स्वच्छ असतात.

SBI मध्ये 644 जागांवर होणार भरती, जाणून घ्या कुठल्या पदासाठी किती जागा

मशरूमसारखी दिसणारी एक वनस्पती आहे. ती कुठेही उगवते. पावसाळ्यात तर ती जास्त दिसते. पण तिची छत्री चपटी असते. हे मशरूम विषारी असतं. ते खाऊन तुमची तब्येत बिघडते.

ग्राहकांसाठी आता सोपं होणार ऑनलाइन शॉपिंग! मोदी सरकारनं बनवले नवे नियम

मशरूम खरेदी करताना त्याच्या छत्रीजवळ रिंगसारखं असता कामा नये. हे चमकदारही असतात. पण ते विषारी असतात. त्यांचा रंग लगेच बदलतो.  शिवाय मशरूम सडकेही असतात. मशरूमवर काळे डाग असतील तर चुकूनही तो खरेदी करू नका.

2.60 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा दर महिन्याला 40 हजार रुपये

मशरूम चवीला चांगलं असतं. त्याची भाजी चवदार लागते. मशरूम सुपातही घालतात. अनेकदा चायनीज पदार्थांमध्येही मशरूम घातले जातात. मशरूमची शेती केली जाते आणि शेतात पिकवलेले मशरूमच खावेत. त्यासाठी त्याची चांगली चाचपणी करूनच ते खरेदी करावेत.

SPECIAL REPORT : भाजपची जागेची खेळी, सेनेलाच बसणार फटका?

First published: June 4, 2019, 8:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या