• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • How to reduce belly fat : लठ्ठपणा कमी करण्याचे हे आहेत सोपे उपाय; पोटावरील चरबीही होईल गायब

How to reduce belly fat : लठ्ठपणा कमी करण्याचे हे आहेत सोपे उपाय; पोटावरील चरबीही होईल गायब

पोटाभोवती साठलेली चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. यासाठी योग्य आहार आणि शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या (How to reduce belly fat) आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : जर तुम्ही लठ्ठपणाने (High Weight) त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. लठ्ठपणा वाढला की पोटाची चरबीही वाढू लागते. लठ्ठपणामुळे बहुतेक लोक चिंतित आहेत आणि वजन कमी करण्यासाठी विविध उपाय अवलंबत आहेत. पोटाभोवती साठलेली चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. यासाठी योग्य आहार आणि शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या (How to reduce belly fat) आहेत. झी न्यूजला आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनशैलीत काही बदल करून वजन आणि पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेऊया. 1. कोमट पाणी प्या डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, जेव्हा-जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा नेहमी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कोमट पाणी चयापचय प्रक्रिया चांगली करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे शरीर हायड्रेट तर होतेच, पण पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबीही कमी होते. पाण्याशिवाय फळे आणि ज्यूसचेही सेवनही फायदेशीर आहे. 2. रात्रीच्या जेवणात कमी कॅलरीज खा डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, तुमच्या नियमित कॅलरीजपैकी ५० टक्के कॅलरीज दुपारच्या जेवणात घ्या, कारण यावेळी पचनशक्ती मजबूत असते, रात्रीच्या जेवणात कमीत कमी कॅलरी घ्या आणि रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी करा. त्यामुळे पोटाची चरबी वाढत नाही. तसेच मिठाई, साखरयुक्त पेये आणि तेलकट पदार्थ यांसारख्या रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सपासून दूर राहा. हे वाचा - या 6 गोष्टी लक्षात ठेवून दिवाळीत करा Smart Shopping, फसव्या ऑफर्स आणि कर्जापासून राहाल दूर 3. वाळलेल्या आल्याचे सेवन करणे कोरडे आले वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. वाळलेल्या आल्याच्या पावडरमध्ये थर्मोजेनिक घटक असतो, जो चरबी जाळण्यात फायदेशीर असतो. वाळलेल्या आल्याची पावडर पाण्यात उकळून त्याचे सेवन करू शकता. हे चयापचय वाढवते आणि अतिरिक्त चरबी बर्न करते. याशिवाय पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुमच्या नियमित आहारात आल्याचा समावेश करा. हे वाचा - चीनचा नवा कांगावा; म्हणे,अमेरिकेतील लॉबस्टर, सौदी अरेबियातील कोळंबी Coronaला कारणीभूत 4. त्रिफळा सेवन करणं आवश्यक डॉ. अबरार मुलतानी म्हणतात की, त्रिफळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे, त्रिफळा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि पचनसंस्था मजबूत करतो. त्रिफळा चूर्ण पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी आहे. याचे नियमित सेवन करावे. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून रोज प्या.
  Published by:News18 Desk
  First published: