मुंबई. 21 डिसेंबर : मासिक पाळी हा कोणत्याही महिलांशी संबंधीत महत्त्वाची नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. महिन्यातून एकदा होणाऱ्या शारीरिक क्रियेत नैसर्गिकरित्या महिलांच्या शरीरातून रक्तस्त्राव होतो. या काळा महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. याचा परिणाम महिलांच्या शारीरासोबत मानसिक आरोग्यावर देखील होत असतो. या काळात होणाऱ्या वेदनांमुळे महिला आणि मुली खूप चिंतेत असतात. तुम्हालाही अशा वेदना होत असतील आणि त्यापासून आराम मिळवायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुचवलेले काही उपाय सांगत आहोत. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी आणि योगासाठी प्रसिद्ध आहे. तिने सुचवलेले काही व्यायाम केल्या तुम्हाला मासिक पाळीदरम्यान वेदना होणार नाही. जाणून घेऊया शिल्पा शेट्टीने मासिक पाळीतील वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते व्यायाम सुचवले आहेत.
Intimate Hygiene : कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते सॅनिटरी नॅपकिन; असे निवडा योग्य पॅडशिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ शेअर करून मासिक पाळीदरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तिने महिलांसाठी काही योगासने सांगितली आहेत. ही योगासणे केल्यास महिलांना मासिक पाळीच्या वेदना आणि पीसीओडीची समस्येपासून सुटका मिळवण्यास मदत होईल. झी न्यूज हिंदीने यासदर्भात दिलेल्या रिपोर्टमध्ये शिल्पाने महिलांना बालासन, पद्मासन योग आणि दंडासन ही तीन योगसने सुचवली आहेत. ही योगासने केल्यास हार्मोन्स संतुलित राहतात.
बालासन : बालासन केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुरळीत राहते. तसेच नितंब, मांड्या आणि घोटे मजबूत होतात. तुम्ही खूप तणावाखाली असाल तर ही हे योगासन नक्की करा. कारण हे योगासन केल्याने शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य भागालाही मसाज मिळतो. हा योग केल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळतो. दंडासन : दंडासन देखील मासिक पाळीत अतिशय फादेशीर ठरू शकते. हे आसन केल्याने पाठीचे स्नायू मजबूत होतात आणि पाठीचा कणा लांब करण्यास आणि पसरण्यास मदत होते. तसेच हे आसन केल्याने खांदे आणि छातीलाही फायदा होतो.
Periods : पाळीदरम्यान तुम्हीही करता या चुका? वेळीच न थांबवल्यास येऊ शकतो हार्ट अटॅकपद्मासन : पद्मासन केल्याने मनाला शांती मिळते. या आसनामुळे गुडघे आणि नितंबांच्या वेदनांमध्ये लवचिकता वाढते आणि स्नायूंना रिलॅक्स होण्यास मदत होते. मासिक पाळी दरम्यान पद्मासन केल्याने तीव्र वेदनांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)