Home /News /money /

दरमहा केवळ 240 रुपये देऊन मिळवा 1 कोटींचा हेल्थ इन्शुरन्स, कॅशलेस क्लेम 20 मिनिटात होईल अप्रूव्ह

दरमहा केवळ 240 रुपये देऊन मिळवा 1 कोटींचा हेल्थ इन्शुरन्स, कॅशलेस क्लेम 20 मिनिटात होईल अप्रूव्ह

केवळ 240 रुपये दरमहा देऊन 1 कोटी रुपयांपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला मिळवता येईल. या योजनेची विशेष बाब म्हणजे याअंतर्गत केलेला क्लेम 20 मिनिटांत अप्रूव्ह होईल

    नवी दिल्ली, 17 जून: कोरोना काळात आरोग्य विम्याची (Health Insurance) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमीतकमी गुंतवणूक करून उत्तमोत्तम सुविधा देणारे इन्शुरन्स खरेदी  (Best health insurance plan) करण्याकडे ग्राहकांचा कल असते. तुम्हाला देखील स्वस्त पण त्याचवेळी योग्य सुविधा देणारा इन्शुरन्स खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. ही संधी नवी जनरल इन्शुरन्सकडून  (Navi General Insurance) मिळते आहे. याठिकाणी केवळ 240 रुपये दरमहा देऊन 1 कोटी रुपयांपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला मिळवता येईल. या योजनेची विशेष बाब म्हणजे याअंतर्गत केलेला क्लेम 20 मिनिटांत अप्रूव्ह होईल. वाचा सविस्तर वाचा काय आहे योजना? नवी जनरल इन्शुरन्स  (Navi General Insurance) ग्राहकांना EMI च्या माध्यमातून मंथली सब्सक्रिप्शनच्या आधारे आरोग्य विमा खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. यामुळे ग्राहकांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणं सोपं आणि स्वस्त होतं. नवी हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसी EMI च्या माध्यमातून दरमहा 240 रुपये या कमीतकमी किंमतीतही खरेदी करता येतील. ग्राहकांना एकत्र वार्षिक प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण पेपरलेस प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये कोणताही एजंट सहभागी नाही आहे आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे. ग्राहकांना नवी हेल्थ अॅपच्या माध्यमातून दोन मिनिटांत इन्शुरन्स खरेदी करता येईल. App वरच त्वरित त्यांना इन्शुरन्श इश्यू केला जाईल. यामध्ये 2 लाखापासून 1 कोटी रुपयांपर्यंतचा वैयक्तिक आणि फॅमिली इन्शुरन्स (Family Health insurance) समाविष्ट आहे. कॅशलेस क्लेम केवळ 20 मिनिटांत होईल अप्रूव्ह या स्कीममध्ये रकमेचा क्लेम करण्यासाठीची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. कॅशलेस क्लेम केवळ 20 मिनिटांत अप्रूव्ह होईल. क्लेम सेटलमेंटमध्ये नवी हेल्थ इन्शुरन्स 97.3 टक्क्यांसह सर्वात पुढे आहे. यांच्या नेटवर्कमध्ये 10 हजारपेक्षा जास्त कॅशलेस रुग्णालयं जोडली गेली आहेत. ही रुग्णालयं देशातील 400 हून अधिक ठिकाणांवर आहेत. ग्राहक गूगल प्लेस्टोअरवर या लिंकवर जाऊन नवी हेल्थ अॅप डाउनलो़ड करू शकता- https://navi-gi.onelink.me/hwGa/healthinsurance गंभीर आजारांवर देखील करा उपचार नवी हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत  इन-पेशेंट हॉस्पिटलायझेशन, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च, कोविड 19 हॉस्पिटलायझेशन, घरामध्ये हॉस्पिटलायझेशन, 393 डे-केयर प्रोसिजर, रोड अँबुलन्स कव्हर, वेक्टर बोर्न डिसिज, ऑप्शनल गंभीर आजार, मॅटर्निटी आणि नवजात बालकांसाठी कव्हरसह 20 पेक्षा जास्त बेनिफिट्स समाविष्ट आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance, Money

    पुढील बातम्या