जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हे छोटे बदल केल्याने हिवाळ्यातही घर राहील गरम; रूम हिटरची पडणार नाही गरज

हे छोटे बदल केल्याने हिवाळ्यातही घर राहील गरम; रूम हिटरची पडणार नाही गरज

हे छोटे बदल केल्याने हिवाळ्यातही घर राहील गरम; रूम हिटरची पडणार नाही गरज

काही दिवसांपासून थंडीने जोर धरला आहे. अशा वेळी थंडीपासून संरक्षण कऱण्यासाठी काही लोक घरात रुम हिटरचा वापर करतात. परंतु तुम्ही काही नैसर्गिक पर्याय वापरूनही घर उबदार ठेवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : सध्या हिवाळा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासू्न थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. आतापर्यंत कपाटात बंद असलेले स्वेटर आता अनेकांनी बाहेर काढले आहेत. कारण हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालणे आवश्यक असते. परंतु कधी कधी थंडी एवढी जास्त असते की हे कपडे देखील पुरेसे वाटत नाही. कारण थंडीमुळे संपू्र्ण घरही थंड होते आणि घरात फरशीवर चालणे देखील अवघड होते. अशा वेळी बरेच लोक आपले घर गरम ठेवण्यासाठी रूम हिटरचा वापर करतात. परंतु ते सर्वांना परवडत नाही. कारण त्यामुळे वीज बिल र वाढते आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तुम्हाला रुम हिटरचा वापर करायचा नसेल आणि तरी देखील खोली उबदार ठेवायची असेल तर तुम्ही येथे दिलेल्या काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता. जाणून घेऊया हिटरशिवाय घर गरम ठेवण्याचे नैसर्गिक उपाय.

हिवाळ्यात रूम हिटर वापरणं ठरू शकतं घातक; हे दुष्परिणाम एकदा नक्की वाचा

हिवाळ्यात असे उबदार ठेवा तुमचे घर स्टीमची मदत घ्या : खोली गरम करण्यासाठी तुम्ही शॉवर स्टीमची पद्धत वापरून पहा. जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करा आणि बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवा. यामुळे गरम पाण्याच्या वाफेने खोली गरम होईल.

News18लोकमत
News18लोकमत

सूर्यप्रकाश असेपर्यंत खिडक्या उघड्या ठेवा : हिवाळ्यात घरात थंड हवा येऊ नये म्हणून आपण घराच्या खिडक्या बंद ठेवतो. परंतु दिवसा खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. सूर्य मावळल्यानंतर गेल्यानंतर खिडकी बंद करा जेणेकरून खोली उबदार राहील. मॅटचा वापर करा : हिवाळ्याच्या काळात घरातील फरशी खूप थंड राहते. अशावेळी तुम्ही फरशीवर मॅट किंवा रग्जचा वापर करू शकता. फरशीवर मॅट टाकल्‍याने तुमच्‍या पायाला थंडीपासून संरक्षण मिळेल आणि तुमच्‍या घराचा लूकही वाढेल. प्लास्टिक रॅपचा वापर करा : तुम्ही घराच्या खिडक्या बंद केल्यानंतही बाजूने किंवा फटीतून वारा येत असेल तर खिडक्यांच्या कडांना प्लास्टिकचा रॅप चिकटवा. त्यामुळे थंड वारा घरात येऊ शकणार नाही. डार्क पडदे वापरा : घराच्या खिडक्या आणि काचेच्या दरवाज्यांवर जाड पडदे बाहेरून येणारी थंड हवा आत येण्यापासून रोखतात. हिवाळ्यात डार्क कलरचे पडदे निवडावेत. त्यामुळे थंड हवा खोलीत येणार नाही आणि तुमची खोली उबदार राहिल. कोकोनट मिल्क टीचे फायदे माहितीये? वजनासोबत वयही करते कमी, पाहा बनवण्याची पद्धत गरम पाण्याची पिशवी वापरा : एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, हिवाळ्यात हॉट वॉटर बॅग म्हणजेच गरम पाण्याची पिशवी वापरणे चांगले असते. झोपताना पलंगावर गरम पाण्याची पिशवी ठेवा, त्यामुळे तुमचा पलंग उबदार राहतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात