• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • आहारात या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर; Stamina वाढवण्यासाठी होईल मदत

आहारात या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर; Stamina वाढवण्यासाठी होईल मदत

आपल्याला व्यायामासाठी दररोज सकाळी जीमला अथवा मॉर्निग वॉकला (Morning walk) जावं लागतं. त्यासाठी आपण तयारी करून जातो, त्यामुळे आपले हेल्थ आणि फिटनेस हे मेंटेन राहते. त्याचबरोबर आपल्याला विविध आजारांपासूनही सुटका मिळवता येते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : आपल्याला व्यायामासाठी दररोज सकाळी जीमला अथवा मॉर्निग वॉकला (Morning walk) जावं लागतं. त्यासाठी आपण तयारी करून जातो, त्यामुळे आपली हेल्थ आणि फिटनेस हे मेंटेन राहतं. त्याचबरोबर आपल्याला विविध आजारांपासूनही सुटका मिळवता येते. परंतु अनेकदा आपल्याला व्यायाम करत असताना दम लागतो आणि घाम येत असतो. कारण त्यावेळी आपला स्टॅमिना (How to increase increase stamina) हा कमी पडत असतो. त्यामुळे आता आपल्याला व्यायाम अथवा आपला स्टॅमिना  (medicine to stamina for running) वाढवण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते. त्यासाठी आपण सातत्याने व्यायाम (stamina for running) करत राहणं हा पर्याय निवडतो. त्यामुळे आपल्याला त्यातून काही प्रमाणात रिझल्ट मिळतो, पण त्यात सातत्य नसल्याने आपल्या स्टॅमिना हा आहे तसाच राहतो. त्यामुळे आता आपण आपला स्टॅमिना कसा वाढवायचा याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. स्टॅमिना वाढवण्यासाठी सहनशक्ती ही आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाची असते. शरीरातील कोणत्याही कृतीसाठी आपल्याला ऊर्जा हवी असते. त्यामुळे सहनशक्ती आणि तग धरण्याची क्षमता आपल्याला अधिक कार्यक्षम होण्यास मदत करते.आरोग्य तज्ञांच्या मते, शरीरात तग धरण्याची क्षमता नसेल तर तुम्हाला अनेकदा थकवा येतो. शारीरिक ताकदीमुळे आपल्याला कमी वेळात थकवा किंवा दम लागत नाही. Relationship Promises : प्रेमळ नात्यासाठी आपल्या पार्टनरची अशी घ्या काळजी आहार तज्ञ डॉ.रंजना सिंह याविषयी बोलताना म्हणाल्या की कमी पाणी पिल्याने निर्जलीकरण आणि थकवा येतो. हायड्रेटेड राहणे शरीरासाठी फायदेशीर आहे. पाण्याव्यतिरिक्त आपण नारळ पाणी आणि लिंबूपाणीदेखील घेणे गरजेचे आहे. कारण त्यात असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा पुरवतात. आपल्या आहारातील पोषकतत्व हे शरीराची क्षमता राखण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यासाठी आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सचा पुरेसा समावेश करायला हवा कारण त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. फास्ट फूड आणि शीतपेयांवर अवलंबून राहणे टाळायला हवं. तणावपूर्ण जीवनशैली आपल्या शारीरीक आरोग्याचे नुकसाम करू शकते. त्यासाठी सतत योग आणि ध्यान केले तर शरीराला आराम देऊन तणाव कमी करता येऊ शकतो.
  Published by:Atik Shaikh
  First published: