मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! लक्षणं नसतानाही झालेली असू शकते कोरोनाची लागण; अशा पद्धतीने ओळखा Asymptomatic Corona

सावधान! लक्षणं नसतानाही झालेली असू शकते कोरोनाची लागण; अशा पद्धतीने ओळखा Asymptomatic Corona

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Corona Symptoms: काही लोकांमध्ये विविध कारणांमुळे कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. तरुणांची रोग प्रतिकारशक्ती ज्येष्ठांपेक्षा अधिक चांगली असल्यामुळे तरुणांमध्ये ज्येष्ठांपेक्षा सौम्य लक्षणं दिसतात.

    नवी दिल्ली 06 मे : कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरल्यानंतर देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. त्यानंतर देशासह राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. परिस्थिती पूर्ववत होत असतानाच दिल्लीसह आणखी काही राज्यांमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्यानं शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर, देशातही पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे, त्यामुळे येत्या काळात कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

    येत्या 10 ते 15 दिवसांत भारतातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना विषाणूची लक्षणं प्रत्येकालाच सारखी जाणवतात, असं नाही. तसेच हा विषाणू प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. काही लोकांना या विषाणूमुळे गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. तर काही लोकांमध्ये या विषाणूची फक्त सौम्य लक्षणं (Corona Symptoms) दिसतात. कोणतंही लक्षण नसलेले लोक इतरांना सहज संक्रमित करू शकतात. त्यामुळे कोरोनाची लक्षणं नसलेली एखादी व्यक्ती कोरोना कॅरियर आहे की नाही ते कसं शोधायचं हे जाणून घेऊया.

    चीनमध्ये कोरोनाचा कहर; 21 कोटी लोक घरांमध्ये कैद, 73 वर्षांत पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

    काही लोकांमध्ये विविध कारणांमुळे कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. तरुणांची रोग प्रतिकारशक्ती ज्येष्ठांपेक्षा अधिक चांगली असल्यामुळे तरुणांमध्ये ज्येष्ठांपेक्षा सौम्य लक्षणं दिसतात. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या (Duke University) अभ्यासात असं दिसून आलंय की विशेषत: 6 ते 13 वयोगटातील मुलांना कोरोनाची लक्षणं नसतात. कारण त्यांना श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते. दरम्यान, जेव्हा या वयातील मुलांना कोरोना होतो तेव्हा ते कमी धोकादायक असते. याशिवाय, रोगाची गंभीरता ही एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण स्थितीवर आणि तीव्र संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.

    तुम्ही Asymptomatic आहात की नाही हे कसं ओळखावं

    तुम्ही Asymptomatic म्हणजेच लक्षणं नसलेले आहात की नाही हे तुम्ही कोरोनाची RT-PCR किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करून माहित करून घेऊ शकता. कोरोनाची लागण होऊनही तुमच्या शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी तुम्ही तुमची टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःला क्वारंटाईन करावं. यासंदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

    जर्मनीत एका दिवसात सापडले जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण; इतर देशांचे असे आहेत हाल

    कोरोनाची लक्षणे काय आहेत?

    उच्च ताप, कफ, वास न येणे, चव न लागणे, सर्दी, थकवा जाणवणे, डोकेदुखी, श्वासोच्छवासाची समस्या, स्नायू किंवा शरीर दुखणे, घसा खवखवणे, उलट्या होणे, अतिसार, त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ आणि लालसरपणा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही अनेक कोरोना रुग्णांना जाणवत आहेत. तसेच ज्या लोकांना नुकतंच Omicron BA.2 ची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये मळमळ, अतिसार, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यासारखी लक्षणं जाणवत आहेत.

    First published:

    Tags: Corona spread, Coronavirus symptoms