मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अंक शोधा आणि तुमची हुशारी सिद्ध करा, तुम्ही स्वीकारणार का हे चॅलेंज?

अंक शोधा आणि तुमची हुशारी सिद्ध करा, तुम्ही स्वीकारणार का हे चॅलेंज?

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक गणिती संख्या दिसत आहे आणि ती कुठे आहे हे तुम्हाला शोधून काढायची आहे, मग जमेल ना?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई १३ नोव्हेंबर : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. हे फोटो किंवा व्हिडीओ आपल्या पोट धरुन हसायला लावतात, तर कशी मित्रांसोबत शेअर करायला भाग पाडतात. त्यात ऑप्टीकल इल्यूजनच्या फोटोंनी लोकांनी वेडच लावलं आहे. अशा फोटोंमधली उत्तर शोधायला आणि आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी लोक असे चॅलेंजेस घेतात.

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो हे आपले डोळे आणि मन दोघांनाही फसवतात. हे फोटो पाहाताना बऱ्याचदा आपल्याला वाटते की आपण जे पाहात आहोत, ते सत्य आहे परंतु तसं नसतं.

हे ही पाहा : वर्गात हरवला शिक्षकाचा चष्मा, त्याला शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का?

सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक गणिती संख्या दिसत आहे आणि ती कुठे आहे हे तुम्हाला शोधावे लागणार आहे.

हा फोटो एका जुण्या आणि बंद पडलेल्या खोलीचा आहे. या खोलीची अवस्था फारच खराब झाली आहे. अनेक गोष्टी इकडे तिकडे पडल्या आहेत, तर काही गोष्टी तुटलेल्या देखील आहेत. या खोलीतही आग लागल्याचे समजते. तसेच या खोलीत अंक देखील लपला आहे. आता तुम्हाला हा अंक शोधायचा आहे आणि सांगायचा आहे.

उत्तर सांगाल तर तू प्रतिभावान आहेस

या चित्राची गंमत म्हणजे हा आकडा अजिबात दिसत नाही. खोलीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून काचेच्या वस्तू इकडे-तिकडे विखुरलेल्या असल्याचे चित्र दिसत आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तो नंबर दिसत नाही. पण जर तुम्हाला हा नंबर सापडला तर तुम्ही प्रतिभावान आहेत, असं समजा.

तुम्हाला अजूनही अंक सापडला नसेल, तरी काळजी करु नका. आम्ही तुम्हाला मदत करु.

या फोटोत खोलीच्या बाहेर आणि अगदी समोर दिसणारी खिडकीही तुटलेली आहे. त्याची काचही गायब आहे. यामध्ये वरच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकाच्या फ्रेमममध्ये गणिताचा चार क्रमांक दिसत आहे. हाच तो अंक जो तुम्हाला शोधून काढायचा होता.

व्हायरल फोटो

आता तुम्हाला याचं उत्तर मिळालंच असेल, आता हा फोटो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा ते किती हुशार आहेत.

First published:

Tags: Photo viral, Social media, Viral, Viral photo