जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुण्यात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, जाणून घ्या कशी ओळखायची पनीरमधील भेसळ

पुण्यात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, जाणून घ्या कशी ओळखायची पनीरमधील भेसळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Pune Fake Paneer: तुमच्या आवडीच्या पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलंय. पनीरमधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती तुम्हाला माहिती हव्यात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 6 सप्टेंबर :  जवळपास प्रत्येक घरात दही (Curd), दूध (Milk), तूप (Ghee), पनीर (Paneer) ही डेअरी प्रॉडक्ट (Dairy Product) असतात. अनेकांना डेअरी प्रॉडक्टचं सेवन करायला खूप आवडतं. त्यातच व्हेज खाणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला की तो हमखास पनीर मागवतो,  पण आता पनीर आणि त्यापासून बनवले जाणारे विविध पदार्थ खाताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुमच्या आवडीच्या पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलंय. नुकतीच पुणे (Pune) जिल्ह्यात पनीरमध्ये भेसळ करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पनीरमधली भेसळ शोधणं गरजेचं आहे. यासंबंधी फूड डॉट एनडीटीव्ही डॉट कॉमने वृत्त दिलं आहे. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने छापा घालून कारवाई करुन बनावट पनीरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आर. बी. डी. पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून, घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मधुमेहींसाठी औषधच आहे ‘हे’ कुकिंग ऑईल; तेलही कंट्रोलमध्ये ठेवतं डायबेटिज पनीरमधील भेसळ कशी ओळखणार? - पनीर भेसळुयक्त आहे की नाही, हे ओळखण्यासाठी ते कुस्करून बघा. जर, पनीर तुटून बारीक व्हायला लागलं तर ते बनावट आहे. कारण त्यात असलेली स्किम्ड मिल्क पावडर जास्त दबाव सहन करू शकत नाही. - शुद्ध पनीर आणि बनावट पनीरमध्ये एक साधासा फरक आहे तो म्हणजे मऊपणा. शुद्ध पनीर मऊ असतं. पण तुमचं पनीर घट्ट असेल तर ते भेसळयुक्त आहे, हे समजून घ्या. घट्ट पनीर खाताना रबरासारखं स्ट्रेच होऊ शकतं. - पनीरची ओळखण्याची तिसरी पद्धत म्हणजे आयोडिन टिंचर. सर्वांत आधी पनीर पाण्यात उकळून थंड करा. आता त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा झाला असेल तर ते भेसळयुक्त आहे. भेसळयुक्त पनीर खाणं टाळा, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा रितीने तुम्ही पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखू शकता. पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय. त्यामुळे पनीर विकत घेतल्यानंतर त्याची तपासणी करून नंतरच पदार्थ बनवा. शिवाय डेअरी प्रॉडक्टमध्येही भेसळीचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळे विश्वासार्ह ठिकाणांहून प्रॉडक्ट्सची खरेदी करा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात