मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Cooking oil for Diabetes : मधुमेहींसाठी औषधच आहे 'हे' कुकिंग ऑईल; तेलही कंट्रोलमध्ये ठेवतं डायबेटिज

Cooking oil for Diabetes : मधुमेहींसाठी औषधच आहे 'हे' कुकिंग ऑईल; तेलही कंट्रोलमध्ये ठेवतं डायबेटिज

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

डायबेटिज म्हणून फक्त गोड पदार्थांचा विचार करू नका. खाद्यतेलाचाही ब्लड शुगरवर परिणाम होत असतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 सप्टेंबर : उत्तम आरोग्यासाठी योग्य आणि चांगल्या सवयी शरीराला लावून घेणं गरजेचं असतं. तसंच उत्तम आहारदेखील अतिशय गरजेचा असतो. अनेक वेळा आपण आहारतज्ज्ञांचा (Nutritionist) सल्ला घेत असतो आणि त्याबरहुकूम दिवसाचं खाण्याचं वेळापत्रकही नेटाने पाळत असतो. वेळापत्रक पाळणं कधीकधी अवघड जातं; पण आरोग्याच्या भविष्यातल्या तक्रारी टाळण्यासाठी उत्तम आणि संतुलित आहार (Healthy and Controlled Diet) महत्त्वाची भूमिका बजावतो. आहाराच्या सवयी चुकीच्या असतील तर त्याचा परिणाम तब्येतीवर होतोच आणि विविध आजारांना निमंत्रण मिळतं. डायबेटीस (Diabetes) या आजारावर कायमस्वरूपी औषध नाही. नियमित पथ्यपालन (Regular Diet) करणं आवश्यक असतं. कारण डायबेटीस झालेल्या व्यक्तीच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण पथ्य न पाळल्यास असंतुलित होतं आणि त्यामुळे पेशंटला गंभीर परिणामांना ही तोंड द्यावं लागतं.

डायबेटीसग्रस्तांना आहारात गोड पदार्थ टाळा, उसाचा रस पिऊ नका, बिनसाखरेचा चहा घ्या असे सल्ले दिले जातात; पण केवळ साखर सेवनावर बंधन घातल्याने डायबेटीस नियंत्रणात राहतो असं नाही तर त्याच्या जोडीला इतर पदार्थांच्या होणार्‍या सेवनाकडे दुर्लक्ष झालं तरीही धोका संभवतो. म्हणूनच डायबेटीसग्रस्तांनी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचं (High Glycemic Index Food) म्हणजेच व्हाइट ब्रेड, बटाटा, मका, भात या पदार्थांचं सेवन टाळणं अत्यावश्यक असतं. निरीक्षणातून असं दिसून आलंय, की डायबेटीस झालेले पेशंट्स पथ्य पाळताना आपल्या खाद्यतेलाच्या वापराकडे दुर्लक्ष करतात. डायबेटीसग्रस्तांच्या आहारात कुठल्या प्रकारचं खाद्यतेल वापरलं जात आहे हेदेखील महत्त्वाचं ठरतं. कारण त्याचा थेट परिणाम रक्तातल्या साखरेच्या प्रमाणावर होत असतो. खाद्यतेलात असणारे काही घटक हे डायबेटीसग्रस्तांसाठी वर्ज्य आहेत.

हे वाचा - 

डायबेटीसग्रस्तांनी कोणतं खाद्यतेल वापरणं रास्त आहे, याबाबत माईएमआयसी हॉस्पिटलच्या डाएटिशियन (Dietician) डॉ. रितू पुरी यांनी माहिती दिल्याचं वृत्त हरजिंदगीने दिलं आहे.

तिळाचं तेल

डायबेटीसग्रस्तांनी रोजच्या जेवणात तिळाच्या तेलाचा वापर केल्यास फायदाच होतो. तसंच तिळाच्या तेलाचा वापर हा स्मृतिभ्रंश, दात किडणं आणि हिरड्यांच्या आजारावर रामबाण उपाय ठरतो.

भुईमुगाचं तेल

भुईमुगात पॉलिअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. या तेलात व्हिटॅमिन ई विपुल प्रमाणात असल्याने ते अ‍ॅटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. एका अभ्यासातून असं दिसून आलंय, की भुईमुगाच्या तेलाच्या वापरामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि पर्यायाने डायबेटीसदेखील नियंत्रणात राहतो.

जवस तेल

अळशीच्या म्हणजेच जवस तेलात म्युसिलेज नावाचे फायबर्स असल्याने खाल्लेल्या पदार्थांचं पचन संथपणे होतं. या तेलाच्या वापरामुळे खाद्यपदार्थांतलं ग्लुकोज रक्तात हळूहळू शोषलं जातं, जेणेकरून रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. पर्यायाने, डायबेटीसग्रस्तांच्या शरीरातल्या इन्सुलिनचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. अर्थातच, अळशीचं तेल डायबेटीसग्रस्तांसाठी उपकारक ठरतं.

हे वाचा - Diabetes Signs: रक्तातील साखर कमी झाल्याचं कसं ओळखाल? 'ही' आहेत प्रमुख लक्षणं

राइस ब्रान तेल

राइस ब्रान तेल हे हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे. त्यात पॉलिअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड या अ‍ॅसिड्सचं प्रमाण खूप असल्याने डायबेटीसग्रस्तांसाठी साखरेचं प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत होते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्रीच्या अहवालात तसं नमूद केलं आहे.

ऑलिव्हचं कच्चं तेल

बाजारात उपलब्ध असणारं कच्च्या ऑलिव्हचं तेल हे पोषणतत्त्वांनी युक्त असतं. या तेलाचा आहारात समावेश केल्याने रक्तातल्या साखरेचं आणि ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात राहतं. तसंच या तेलामुळे लो डेंसिटी लिपोप्रोटिन कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहतं. हृदयाशी संबंधित आजारांना आळा बसतो. रोमच्या सॅपिएंजा विश्वविद्यालयाच्या निरीक्षणानुसार कच्च्या ऑलिव्ह तेलाच्या वापराने रक्तातल्या साखरेचं प्रमाण, ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएल कोलेस्टेरॉल ह्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या नियंत्रणात राहतं.

हे वाचा - Detox Drinks : 'ही' आहेत डायबेटिस पेशंटसाठी उपयुक्त डिटॉक्स ड्रिंक्स, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास फायदेशीर

ह्याव्यतिरिक्त डायबेटीसग्रस्तांसाठी बदाम तेल, पांढर्‍या आणि काळ्या मोहरीचं तेल, अक्रोडाचं तेल, अ‍ॅव्होकॅडोचं तेल आणि सूर्यफूल तेलसुद्धा गुणकारी आहे. वरील सर्व तेलांचा आहारात समावेश असणं योग्यच आहे. परंतु सतत एकाच तेलाचा वापर करणं टाळायला हवं. यासाठीच या विविध तेलांचा वापर आहारात असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, चार जणांच्या कुटुबात कुठल्याही प्रकारचं तेल एकदा वापरल्यास, पुढच्या वेळेस दुसर्‍या तेलाचा वापर करावा, जेणेकरून विविध तेलांचे विविध फायदे कुटुंबातल्या सर्व सदस्यांना मिळतील.

First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle, Tips for diabetes