मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आपण खरेदी केलेली औषधं खरी आहेत की बनावट, फोनवर क्लिक करून मिळणार माहिती

आपण खरेदी केलेली औषधं खरी आहेत की बनावट, फोनवर क्लिक करून मिळणार माहिती

बनावट औषधं कशी ओळखायची

बनावट औषधं कशी ओळखायची

बनावट औषधं पकडण्यासाठी केंद्र सरकारने नवी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 300 नामांकित औषध कंपन्यांच्या ब्रँडवर QR कोड आणि बारकोड बसवले जातील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आपण मेडिकलमधून औषध आणतो, पण ते खरं आहे की बनावट याबद्दल आपल्याला माहीत नसतं. पण आता मोबाईल फोनच्या मदतीने एका क्लिकवर तुम्ही खरेदी केलेलं औषध खरं आहे की बनावट हे तुम्ही शोधू शकता. बनावट औषधं पकडण्यासाठी केंद्र सरकारने नवी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 300 नामांकित औषध कंपन्यांच्या ब्रँडवर QR कोड आणि बारकोड बसवले जातील. याबाबत सरकारने कंपन्यांना आदेश दिले आहेत. कंपन्या हे बार कोड लावतील. यानंतर तुम्ही घरी बसून या औषधांची माहिती घेऊ शकता, असं सरकारने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलंय.

खरी आणि बनावट औषधं शोधणं होईल सोपं

तुम्ही फोनच्या कॅमेऱ्याने स्कॅन करताच औषधाशी संबंधित सर्व माहिती तुमच्या मोबाईल फोनवर काही सेकंदांत उपलब्ध होईल. पुढील वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून ही नवीन सेवा नागरिकांसाठी सुरू केली जाणार आहे. सरकारच्या नवीन आदेशानंतर औषधांवर क्यूआर कोड आणि बार कोड लावले जाणार आहेत. सरकारने फार्मा कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. सुरुवातीला, हा नवीन नियम 300 प्रसिद्ध ब्रँडच्या औषधांना लागू होईल. पेन किलर, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, ब्लड शुगरची औषधं यांचा समावेश यामध्ये आहे.

स्कॅन केल्यावर तुम्हाला युनिक प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन कोड दिसेल. यासोबतच जेनेरिक औषधाचीही माहिती मिळेल. ब्रँडचे नावही त्यावर दिसेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनीचा पत्ताही त्यामध्ये असेल. औषधाची मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेटही त्यावर दिलेली असेल. याशिवाय त्या औषधाचा बॅच क्रमांक दिला असेल.

हे वाचा - रक्त पिऊन त्रास देणाऱ्या उवांचं मूळ अमेरिकेत; दर वर्षी 1.20 कोटी जणांना भेडसावते

बार कोड सर्व्हिसमुळे काय फायदा होईल

औषधांवरील बारकोडबद्दल सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच औषध कंपन्यांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. कारण अलीकडे बनावट औषधांचं प्रमाण मोठं वाढलं आहे. त्यामुळे मोठ्या फार्मा कंपन्यांनाही बनावट औषधांमुळे तोटा सहन करावा लागतो. या बारकोड सर्व्हिसमुळे बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यांवर आणि विक्रेत्यांवर आळा बसेल.

हे वाचा - भारतीय पुरुषांसाठी धोक्याची घंटा; स्पर्म काउंट होतोय वेगाने कमी

अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट औषधं विकली जातात. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. साथीचे आजार आल्यानंतर काही वेळा औषधांचा तुटवडा निर्माण होतो, अशा वेळी बनावट औषध विक्रेते जास्त दराने ही नकली औषधं विकून लोकांच्या जिवाशी खेळतात. त्यामुळे येत्या काळा सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसह औषध कंपन्यांचा बराच त्रास कमी होणार आहे.

First published:

Tags: Generic medicine, Medicine