मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रक्त पिऊन त्रास देणाऱ्या उवांचं मूळ अमेरिकेत; दर वर्षी 1.20 कोटी जणांना भेडसावते उवांची समस्या

रक्त पिऊन त्रास देणाऱ्या उवांचं मूळ अमेरिकेत; दर वर्षी 1.20 कोटी जणांना भेडसावते उवांची समस्या

उवा झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली, तर तिच्याही डोक्यावरील केसांत उवा होतात. या उवा एकाच्या केसामधून दुसऱ्याच्या केसांमध्ये जातात.

उवा झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली, तर तिच्याही डोक्यावरील केसांत उवा होतात. या उवा एकाच्या केसामधून दुसऱ्याच्या केसांमध्ये जातात.

उवा झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली, तर तिच्याही डोक्यावरील केसांत उवा होतात. या उवा एकाच्या केसामधून दुसऱ्याच्या केसांमध्ये जातात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 नोव्हेंबर :   डोक्यातलं रक्त पिणारी ही ‘ऊ’ विशेषतः लहान मुलांच्या केसांमध्ये आढळते. सध्या त्यावर अनेक औषधं उपलब्ध आहेत, मात्र पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. वास्तविक ऊ हा कीटक अतिशय लहान पण डोक्यातलं रक्त पिऊन तो त्रास देतो. त्यामुळे डोकं खाजणं, रक्त येणं, अभ्यासात लक्ष न लागणं अशा समस्या मुलांना भेडसावतात. विशेषत: मुलींचे केस लांब असतात त्यांना अधिक त्रास होतो. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज अँड प्रीव्हेन्शनच्या मते, जगभरात दरवर्षी 60 लाख ते 1.20 कोटी लोकांना उवांच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. उवा कशा निर्माण झाल्या, त्या केसांमध्ये कशा येतात? जाणून घ्या.

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, केसातली ऊ दिसायला अतिशय छोटीशी असते. तिचा आकार दोन ते तीन मिलीमीटर इतकाच असतो. प्रौढ उवा अंडाकार असून भुऱ्या रंगाच्या असतात. त्यांना पंख नसतात. या उवा 30 दिवस जगू शकतात. यातल्या मादी उवा दिवसाला सहा अंडी देतात. त्यांना लिखा किंवा निट्स म्हणतात. या लिखा पांढऱ्या आणि ठिपक्यासारख्या स्पष्ट दिसणाऱ्या असतात. या लिखा दोन आठवड्यात प्रौढ उवा बनतात. ही प्रक्रिया सुरुच राहते. त्यामुळे एकदा केसांमध्ये उवा झाल्या, तर सहजासहजी त्या नष्ट करता येत नाहीत.

हेही वाचा - अंघोळ करताना एक छोटीशी चूक आणि महिलेचा गेला जीव; बाथरूममध्ये तुम्हीही तेच करत आहात

उवांचं संक्रमण

उवा झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली, तर तिच्याही डोक्यावरील केसांत उवा होतात. या उवा एकाच्या केसामधून दुसऱ्याच्या केसांमध्ये जातात. तसंच उवा झालेल्या व्यक्तीचा टॉवेल, रुमाल, कंगवा, उशी, अंथरूण हे वापरल्यासही दुसऱ्या व्यक्तीकडे उवांचं संक्रमण होऊ शकतं. स्वच्छता न ठेवल्यानं उवा होतात असा एक समज आहे, मात्र तसं नसून एखाद्या उवा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात स्वच्छ, टापटिप असलेली व्यक्ती आली, तर तिच्याही डोक्यात उवा होऊ शकतात. अनेकदा उवा गरिबांच्या डोक्यात होतात, हाही असाच एक चुकीचा समज आहे.

उवांची लक्षणं

- डोक्यावर केसांच्या मुळाशी लालसर होणं किंवा सूज येणं

- सतत डोकं खाजणं

- डोकं खाजवल्यावर छोटे लालसर व्रण येणं किंवा छोट्या जखमा होणं

- सतत डोकं खाजत असल्यानं लक्ष केंद्रीत न होणं

हेही वाचा - Hair Care : फक्त त्वचाच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर आहे बेसन; असा करा वापर

उवांपासून सुटका करणं ही खूप अवघड गोष्ट असते. कारण केसांमध्ये उवा सहजासहजी उवा दिसत नाहीत. प्रौढ उवा मरतात, पण मरण्याआधी मादी अंडी देते. त्यांच्यापासून पुन्हा उवा निर्माण होत असतात. त्यामुळे उवांना समूळ नष्ट करण्यासाठी उपचार करावे लागतात. त्यात प्रौढ उवा आणि त्यांची अंडी दोन्हीही मारावं लागतं. त्यासाठी बारीक दातांचा कंगवा किंवा फणी वापरता येते. बाजारात मिळणारे शॅम्पू किंवा औषध यांचा वापर केल्यास उवा मरतात. मग कंगव्यानं त्या सहज काढून टाकता येतात. तरीही त्रास होत असेल, तर डॉक्टरांची मदत घेणं सोयीचं ठरतं.

हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार, उवांची प्रजात 1 लाख वर्ष जुनी असल्याचं मानलं जातं. उवांच्या जनुकीय संरचनेनुसार त्यांचं क्लेड्समध्ये वर्गीकरण करण्यात आलं. त्यात त्यांना ओळखता यावं म्हणून ए, बी आणि सी असं विभागलं गेलं. पॅरासिटॉलॉजी जर्नलनुसार, क्लेड बीच्या उवा उत्तर अमेरिकेत निर्माण झाल्या. तिथून त्या युरोप, ऑस्ट्रेलिया व इतर देशांमध्ये गेल्या. उवांच्या समस्येवर वेळीच तोडगा करणं गरजेचं असतं. नाहीतर सतत डोकं खाजवल्यामुळे मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यासाठी डोकं व केसांची नियमित तपासणी हवी.

First published:

Tags: Lifestyle, Woman hair, Women hairstyles