जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय सांगता! डान्स फ्लोअरवर नाचणार्‍यांच्या ऊर्जेमुळे गरम होतं शेकडो लिटर पाणी

काय सांगता! डान्स फ्लोअरवर नाचणार्‍यांच्या ऊर्जेमुळे गरम होतं शेकडो लिटर पाणी

डान्स फ्लोर

डान्स फ्लोर

पाणी गरम करण्यासाठी आगीचा वापर केला जातो. पण डान्स फ्लोअरवर नाचणार्‍यांच्या ऊर्जेमुळे गरम होतं शेकडो लिटर पाणी गरम केलं जात आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 18 ऑक्टोबर : स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथल्या आर्ट्स व्हेन्यूमध्ये माणसांच्या शारीरिक ऊर्जेचा वापर कसा केला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. ग्लासगोमध्ये एक डान्स फ्लोअर आहे. या डान्स फ्लोअरवर नाचणार्‍यांच्या शरीरातल्या कार्बन डायऑक्साइडचा ऊर्जा म्हणून वापर केला जात आहे. ग्लासगोत SWG3 येथे एक डान्स फ्लोअर आहे. नाचताना शरीराची ऊर्जा वाढते. त्यामुळे या डान्स फ्लोअरवर नाचणार्‍यांच्या शरीराचं तापमानही वाढतं; पण ते वाया जात नाही. नाचणार्‍यांच्या शरीरातल्या ऊर्जेमुळे तिथल्या पाण्याचं तापमान वाढतं. परिणामी, पाणी गरम होते. डान्स फ्लोअरचं तापमान कमी होते म्हणजेच थंड होतं. नाचताना व्यक्तीच्या शरीरातून किती तरी ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं. त्याचं मूल्यमापन केल्यास त्यातून 500-600 वॅट थर्मल एनर्जी तयार होते. नाचल्यावर शरीरातून निर्माण होणार्‍या ऊर्जेचा अशाप्रकारे सदुपयोग करण्याचा प्रयोग सुरू आहे. शरीराचं तापमान वाढल्यामुळे थर्मल एनर्जी SWG3 या डान्स फ्लोअरवर या प्रकारचा प्रयोग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे त्या वातावरणातल्या गारव्याचं आणि उष्णतेचं प्रमाण राखलं जातं. हा प्रयोग SWG3 आणि जिओथर्मल एनर्जी स्टार्टअप असलेल्या टाउन रॉक एनर्जीच्या संयुक्त विद्यमाने विकसित केला जातोय. मध्यम गतीने नाचल्यास 250 वॅट इतकी एनर्जी जनरेट होते. टाउन रॉक एनर्जीचे मालक डेव्हिड टाउनसेंड या प्रयोगाबद्दल बोलताना म्हणतात, की लोकांनी उड्या मारत डान्स केला तर 500-600 वॅट ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेचं स्थलांतर 500 फूट खोल असलेल्या 12 बोर होल्समध्ये पंपाद्वारे केलं जातं. तिथून ते एका अंडरग्राउंड रॉक क्यूबमध्ये जातं. त्यामुळे त्या ठिकाणचं पाणी गरम होतं. या एनर्जीचा उपयोग बॅटरीसारखा होतो. या प्रक्रियेमुळे डान्स फ्लोअरवर गारवा निर्माण होतो. कारण इकडची सगळी एनर्जी या नव्या तंत्राद्वारे शोषली जाते. हेही वाचा - स्विगी डिलिवरी बॉयने ट्राफिक पोलीस बनुन केलं असं काम, आता VIDEO ठरतोय चर्चेचा विषय बॉडी हीटमुळे कोणते फायदे होतात? ‘बॉडी हीट शोषून घेण्यासाठी केलेली गुंतवणूक ही 5 कोटी 52 लाख इतकी आहे. ही रक्कम पारंपरिक कूलिंग सिस्टीमपेक्षा कैक पटींनी जास्त आहे; पण या प्रयोगामुळे वीजेचं बिलही कमी येतं. यामुळे हे लाभदायक ठरतंय,’ असं मॅनेजिंग डायरेक्टर अँड्र्यू फ्लेमिंग ब्राउन यांनी म्हटलंय. ते पुढे म्हणाले, ‘थंडीच्या दिवसात डान्स फ्लोअरचं तापमान गरम असतं तर उन्हाळ्यात वातावरण थंड राखलं जातं. अशा प्रकारे 5 वर्षात वीजबिल बचतीमुळे केलेल्या पैशांची गुंतवणूक सहज रिकव्हर होईल.’

    News18लोकमत
    News18लोकमत

    तंत्रज्ञान हे किती प्रगत आणि उपकारक आहे याचीच ही प्रचिती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात